मित्रांनो हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. नारळाला शुभ फळ मानले जाते आणि प्रत्येक शुभकार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाला देवी लक्ष्मीचेही प्रतीक मानतात. प्रत्येक पूजेत नारळ असणे खूप आवश्यक आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. कोठे तीर्थस्थानालाही आपण गेलो की, आधी नारळ घेऊन फोडले जाते आणि भगवंतांना देऊन आपणही खोबर्याचा प्रसाद घेतो आणि नवरात्रीतील देवीला प्रसाद म्हणून नारळ वाहिले जाते. तसेच गणपती मंदिरात सर्व शक्तीस्वरूप देवींच्या देवळात नारळ फोडले जाते.
पण जर आपण नारळ फोडले आणि ते आतून खराब निघाले तर आपल्याला खूप वाईट वाटते. आपल्या मनात असे येते की,देवी देवता आपल्यावर नाराज झाले आहेत म्हणूनच नारळ खराब निघाले.आता आपल्याबरोबर काहीतरी अनुचित घटना घडेल.याच गोष्टीचा आपण विचार करत बसतो. पण विचार करण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा.
यात मी तुम्हाला नारळ खराब का निघते, त्याचे काय शुभ अशुभ परिणाम होतात हे सांगणार आहे. जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा नाही की, तुमच्याबरोबर काहीतरी अशुभ होणार आहे किंवा काहीतरी वाईट घटना घडेल. तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ काहीतरी शुभ घडेल.
मित्रांनो पूजेचे नारळ खराब निघणे शुभ असते. असे सांगितले जाते की, याद्वारे देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. आज मी तुम्हाला नारळाच्या या संकेताविषयी माहिती देणार आहे. जेव्हा आपल्याला या गोष्टींबद्दल काही माहिती नसते.
तेव्हा आपण त्याबद्दल काहीतरी भ्रम निर्माण करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात खूप मोठा प्रभाव पडतात. जेव्हा पूजेचे नारळ खराब निघते तेव्हा आपल्याला दुकानदाराचाही राग येतो आणि त्याच्याशी आपण भांडायलाही जातो. पण दुकानदार सांगतो की, तुम्हाला देव पावला आहे. तेव्हा आपल्या काहीही लक्षात येत नाही.
परंतु याच्यापुढे तुमचे नारळ खराब निघाल्यास तुम्हाला राग येणार नाही तर आनंद होईल. पूजेचे नारळ जर खराब निघाले तर याचा अर्थ असा होतो की, देवाने प्रसाद स्वतः खाल्ला आहे. म्हणूनच नारळ खराब निघते. म्हणजेच ते दुसरे कोणीही खाऊ शकणार नाही.ते संपूर्ण नारळ भगवंतांना अर्पण करण्यात येते.
त्याबरोबरच त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की, तुमची इच्छा, मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. देवाच्या पूजेच्या वेळी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते. असा संकेत आपल्याला याद्वारे मिळतो. यापुढे जर तुमचे पूजेचे नारळ खराब निघाले तर तुम्ही दुखी होऊ नका.
तर उलट आनंद माना की, भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. त्या वेळी तुम्ही जी इच्छा मनात आणाल ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. जर आपण नारळ फोडले आणि ते चांगले निघाले तर काय करावे? पूजेत आपण नारळ फोडले व त्याचे खोबरे व्यवस्थित असेल तर तो प्रसाद आपण एकट्याने न ठेवता मंदिरातील सर्वांना खोबऱ्याचा थोडा थोडा प्रसाद द्यावा.
यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. तर काही व्यक्ती नारळ फोडतात व कोणालाही न वाटता ते नारळ तसेच घरी घेऊन जातात. पण यामुळे तो प्रसाद भगवंतापर्यंत पोहोचत नाही.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.