मित्रांनो, आपला जीवनामध्ये नाते ज्याप्रमाणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे प्रेम देखील महत्त्वाचे आहे याच प्रेमाने नातेसंबंध विषयी मानसशास्त्रामध्ये काही तथ्ये सांगितलेली आहेत. तीच आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
1) लांब केस असलेल्या महिलांकडे पुरुष लवकर आकर्षित होतात.
2) हसणाऱ्या स्त्रिया पुरुषांना खूप लवकर आकर्षित करतात, याउलट स्त्रियांना असे पुरुष खूप आकर्षक वाटतात जे क्वचितच हसतात.
3) स्त्रीला चांगल्या स्वभावाच्या पुरुषाशी फक्त मैत्री करायला आवडते परंतु जे bad boy टाईप पुरुष असतात ते त्यांना मनापासून आवडतात.
4) जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला आपले हृदय पहिल्यांदा देते तेव्हा ती लाजेने मान खाली घालते, परंतु तिचे डोळे मात्र त्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहत राहतात.
5) ज्या मुलीचा चेहरा लहान मुलासारखा असतो, मुले त्या मुलीकडे लवकर आकर्षित होतात.
6) प्रेम मनापासून केले जाते तर आकर्षण हे आपल्या मनाचा खेळ आहे. प्रेमात आपण आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासाठी काहीही करू शकतो मात्र आकर्षणात ते अवघड असते.
7) सनग्लासेस परिधान केल्याने एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सममिती तसेच गूढ रूप येते, त्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक दिसता.
8) विरुद्ध मताच्या लोकांचे प्रेम दीर्घकाळ टिकते.
9) जिथे प्रेमात पडायला फक्त 5 सेकंद लागतात, तिथे प्रेम विसरायला 88 दिवस लागतात.
10) आपल्या प्रिय व्यक्तीवर रागावणे अशक्य आहे.
11) ज्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होता, त्या व्यक्तीच्या बोलण्यावर तुम्ही नेहमीपेक्षा जास्त प्रतिक्रिया देऊ लागता. त्याच्या बोलण्यावर इतर कोणीही हसणार नाही, पण तुम्ही मात्र विनाकारण हसाल.
12) प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे कामात पूर्ण लक्ष लागत नाही. त्याच्या कार्यक्षमतेवर नक्कीच परिणाम होतो.
13) प्रेमात पडण्यापूर्वी आपल्याला आकर्षण वाटू लागते. यालाच काहीजण “पहिल्या नजरेत प्रेमात पडलो.” वगैरे म्हणतात.
14) चित्रपटात जे दाखवले जाते त्यापेक्षा वास्तव नेहमीच वेगळे असते.
15) ज्यांना टोमणे चांगले समजतात, ते दुसऱ्याचे मन सहज वाचू शकतात.
16) जी व्यक्ति तुम्हाला भाव देत नाही, ती तुम्हाला जास्तच आवडू लागते.
17) जास्त बोलणारी मुलगी आणि कमी बोलणारा मुलगा यांची जोडी भन्नाट ठरते.
18) ज्या प्रेमी युगलांमध्ये आपलं नातं लोकांसमोर आणण्याची हिंमत असते, त्यांचं नात दीर्घकाळ टिकतं.
19) जेव्हा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्याचे किमान दोन मित्र त्याच्यापासून दूर जातात.
20) तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांचा तुमच्या मूडवर थेट परिणाम होतो, त्यामुळे चांगले कपडे घाला आणि आनंदी जीवन जगा.
21) जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम/द्वेष करत असाल तर व्यक्त करा, नाहीतर तुम्ही कायम अस्वस्थ राहाल आणि यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागेल.
22) जे खूप जास्त शपथा घेतात, त्यांची मैत्री खरी आणि प्रामाणिक असते.
23) मुलीपासून तुम्ही जितके तुमच्या भावना लपवाल, तितके तुम्ही तिच्या प्रेमात पडाल.
24) डाव्या कानात प्रेमळ व भावनिक गोष्टी बोलल्याने त्या अधिक परिणामकारक ठरतात.
25) प्रेमी युगूलाने फक्त 3 मिनिटे एकमेकांच्या डोळ्यात पाहिल्यास दोघांच्याही हृदयाचे ठोके एकाच वेळी वाढतात.
26) 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारा राग हे दर्शवितो की तुमच्यातील प्रेम कमी आहे.
27) जर एखाद्या मुलीने तुमच्याशी बोलताना तिच्या केसांशी चाळा केला, तर याचा अर्थ ती तुम्हाला मनोमन पसंत करते आहे.
28) अल्कोहोल प्यायल्यानंतर समोरची व्यक्ति अधिक सुंदर दिसते कारण तुम्हाला चेहऱ्याची सममिती व बारकावे लक्षात येत नाहीत.
29) आपल्या प्रियजनांचा हात धरल्याने शारीरिक वेदना तसेच तणाव आणि भीती कमी होते.
30) जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठी मारता तेव्हा ऑक्सिटोसिन स्राव होऊ लागतो आणि चांगले वाटू लागते.
31) ब्रेकअप झालेल्या मुले मोठा मानसिक संघर्ष करतात. कारण त्या मुलांना त्यांच्या ब्रेकअपबद्दल सगळ्यांना सांगणं योग्य वाटत नाही, म्हणूनच हे दुःख अनेक दिवस ते त्यांच्या मनात साठवून ठेवतात.
32) तुम्ही एखाद्या व्यक्तीशी जितके जास्त बोलता तितके त्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची शक्यता जास्त असते.
33) जेव्हा तुम्ही अस्वस्थ असाल, तेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठी मारा, तणाव दूर होईल.
34) वासना आणि आकर्षण संपल्यानंतरच स्त्री आणि पुरुष यांच्यातील खरे प्रेम सुरू होते. जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखत नाही, तोपर्यंत खरे प्रेम कधीही होऊ शकत नाही.
अशाप्रकारे ही काही मानसशास्त्रीय प्रेम आणि नातेसंबंध विषयीची तथ्ये आहेत.