अगदी कमी वेळात घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ आणि साफ करण्याची एकदम साधी आणि सोफी पद्धत आता घरच्या घरीच करा पॉलिश सोन्याचे दागिने ..!!

ट्रेंडिंग

मित्रांनो, सोने हा धातू महागड्या धातूंमध्ये गणला जातो. जवळपास प्रत्येकाकडे सोन्याचे दागिने असतात. अशातच त्यांच्या देखभालीकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. सोने देखील सतत परिधान केल्यामुळे काही काळानंतर ते काळे दिसू लागतात. शरीरातून बाहेर पडणारा घाम आणि घाण यांच्या संपर्कात आल्यानंतर सहसा सोन्याचे दागिने काळे होतात. पण सोन्याच्या दागिन्यांची चमक कमी करण्याचे आणखी एक कारण म्हणजे मेकअप.

तुम्ही जवळपास वापरत असलेले परफ्यूम, मॉइश्चरायझर किंवा कॉस्मेटिक देखील सोन्याचे दागिने घाण करण्यासाठी काम करतात. त्यामुळे देखील सोन्याचे दागिने काळे पडतात. सोन्याची चमक कोणाला आवडत नाही? तिच्याकडे जास्त दागिने आहेत असे कधीही कोणत्याही महिलेने म्हटले नाही! परंतु बहुसंख्य स्त्रिया आणि पुरुषांना सोन्याबद्दल जितके आवडते तितकेच, जेव्हा त्यांच्या दागिन्यांची मूळ चमक गमावली जाते तेव्हा त्यांना भीती वाटते. ते साफ करून घेण्यासाठी तज्ञांकडे जावे या विचाराने देखील लोकांना नको असलेली डोकेदुखी होते.

हे वाचा:   घरामधील, किचनमधील, झुरळंलांना कंटाळला आहात फक्त एक वेळेस हा उपाय करून पहा परत घरामध्ये नावालाही झुरळ दिसले तर बोला !

आपले सोन्याचे दागिने स्वच्छ आणि तेजस्वी ठेवण्याचे सोपे मार्ग आहेत. आणि आपण हे सर्व घरी स्वतः करू शकता. त्यामुळे धीर सोडू नका. तुम्हाला तुमचे आवडते सोन्याचे हार किंवा बांगड्या लॉक करून ठेवण्याची गरज नाही कारण ते पूर्वीसारखे चमकु लागतात. हा उपाय कसा करावा या बद्दलची संपूर्ण माहिती या लेखातून जाणून घेणार आहोत.

बेकिंग सोडा स्वयंपाकात सर्रास वापरला जातो. याच्या वापराने सोन्याचे दागिने देखील स्वच्छ करू शकतो.

यासाठी फक्त 1 चमचे सोडा कोमट पाण्यात विरघळवून त्याची पेस्ट बनवायची आहे. त्या पेस्टमध्ये आपले सर्व दागिने घालावे व त्यांना व्यवस्थित रित्या पेस्ट लावावी. त्यानंतर हे मिश्रण अशा प्रकारे त्या दागिनांना पाच ते दहा मिनिटे ठेवावे. पाच ते दहा मिनिटानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा इतकी हळद घालायची आहे आणि एक चमचा इतके डिटर्जंट पावडर देखील यामध्ये घालायचं आहे.

हे वाचा:   रिंकू राजगुरूच्या अकलूजमधील घराची झलक, पहा फोटो….

हे दोन्ही सामग्री घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला उकळलेले पाणी घालायचे आहे व हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवू द्यावे. दहा ते पंधरा मिनिटे जाणार नंतर तुम्हाला तुमच्या दागिन्यांमध्ये झालेला फरक दिसून येईल जर तुमचे दागिने जास्त घाण झाले नसतील तर ते या पाण्यातच अगदी स्वच्छ होतील. परंतु जर जास्त घाण झाले असतील तर त्यांना मऊ ब्रशच्या साह्याने हलक्या हाताने घासावे व स्वच्छ पाण्याने धुऊन एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. नक्कीच तुमचे दागिने अगदी चकचकीत व नवीन प्रमाणे दिसू लागतील.

अशाप्रकारे हा घरच्या घरी करण्यात येणारा साधा सोपा असा उपाय आहे. ज्यांनी तुमचे काळवटलेले दागिने अगदी नवीन प्रमाणे दिसू लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *