प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोमध्ये ह्या ७ गोष्टी हव्या असतात…..अशी असावी बायको….!!!

मनोरंजन

मित्रांनो, आज पर्यंत सर्वात जास्त विनोद झालेला कोणता विषय असेल तर तो नवरा बायकोचा. आज पर्यंत प्रत्येकाच जीवन या विषयाशी निगडित आहे. आज आपण बायकोने आपल्या नवऱ्याशी कसे वागावे? आणि त्याच्या अपेक्षांची कशी पूर्तता करावी? याविषयी जाणून घेणार आहोत. प्रत्येक नवऱ्याला वाटते की आपल्या बायकोने या सात गोष्टींचे पालन आपल्या संसारात करायला पाहिजे आणि असे झाल्यास कोणत्याच नवरा बायकोचे भांडण होणार नाही.

प्रत्येक नवरा आपल्या बायको कडून कोणता अपेक्षा करतो? प्रत्येक नवरा कुटुंबासाठी अहोरात्र कष्ट करत असतो तो कधी रागावतो, कधी भांडतो परंतु त्याचे भांडण आणि रागही कायम नसतो. नवरा म्हणजे कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ असतो. नवरा म्हणजे सह्याद्री. भक्कम पर्वता सारखे कुटुंबाचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करतो. मुलांच्या भविष्यासाठी जबर तो पत्नीच्या सुखासाठी नेहमीच प्रयत्नात असतो आणि नात्यांची वीण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी तो नेहमी तडजोड करतो, तो म्हणजे नवरा. कुटुंबाच्या जवळ गेलास बायको टोमणे मारते, तर बायकोच्या जवळ गेल्यास कुटुंब दुरावते. असा व्यक्ती म्हणजे नवरा.

ठेच लागली की आई ग परंतु मोठ्या संकटात बापरे असा ज्याचा गजर होतो तोसुद्धा नवरा. शेकडो नाते सोडून सोबत येणाऱ्या पत्नीच्या अपेक्षा आणि स्वप्नपूर्ण करणारा हा नवराच असतो. तर मुलांच्या भविष्याच्या गरजांसाठी अखंड स्वतःला वाहून देणार ही नवराच असतो. इतरांच्या अपेक्षा पूर्ण होताना स्वतः मात्र कुठलीही अपेक्षा न करता अविरतपणे कर्तव्य बजावणारा कर्तव्य पुरुष म्हणजेच नवरा. कुटुंबाचा आधार असलेल्या नवऱ्याच्या आपल्या बायकोकडुन कोणत्या अपेक्षा असतात? ते आता आपण जाणून घेऊया.

1. पत्नीने नवऱ्याला नात्यांच्या कात्रीत पकडून नये. एका कर्तव्यदक्ष नवऱ्याला सर्व नात्याची पूर्तता करणे गरजेचे असते. आई-वडील आणि पत्नी यामध्ये अडकलेला असतो तो म्हणजे नवरा. पत्नीला नवरा हवा असतो परंतु नवऱ्याचे नातेवाईक बरेच वेळा बोचतात. अर्थात प्रत्येक स्त्रीचा हा प्रश्न असतो असेही नाही बरं का. नवऱ्याला अशावेळी बायको की आई वडील असा प्रश्न पडलेला असतो.

हे वाचा:   त्रास देणाऱ्या नातेवाईकांना कसे हँडल करायचं?

खरं तर दोन्ही गोष्टी त्याला श्वास एवढा आवश्यक असतात म्हणून कर्तव्यदक्ष पत्नी बनण्यासाठी प्रत्येक स्त्रीने या गोष्टीला स्वतःच्या कौशल्याने संभाळला हवा. पतीवर राग व्यक्त केल्यापेक्षा बसून चर्चा करायला हवी. कारण निसर्गाने स्त्रीला दुःख रडून मोकळा करण्याचे स्वातंत्र्य आणि तशी भावनात्मक बनवलेले असते. परंतु पुरुषाला पुरुष पणामुळे सहसा रडता येत नाही. तो स्वतः आपल्या आत मध्ये जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्या हातावर हात देऊन त्याला साथ द्या. त्याच्या सर्व नात्याला जपण्याचा प्रयत्न करा.

2. नवरा मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नका. पाण्याला जर मुठीत घट्ट धरले तर काय होईल ? आणि हातात बसेल का ? नवऱ्याची अगदी ती स्थिती असते. नवरा कधीही हातात येत नसतो आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांचा तो त्यांचा भ्रम असतो. तो फक्त विश्वासाने, प्रेमाने, आपलेपणाने जवळील असतो. दिवसभर घराबाहेर राहणारा नवरा फक्त आणि फक्त प्रेमाने जवळ जाऊ शकतो. तुम्ही त्याला मुठीत ठेवणे शक्य नसते.

3. प्रत्येक पत्नी ने पती चा आदर करायला पाहिजे. परिस्थिती कशीही असो पत्नीने पतीचा आदर ठेवलाच पाहिजे. कारण जेव्हा घरातील स्त्रीच जर आदर ठेवत नसेल तर अशा घरातील पुरुष घराबाहेर पडताना आत्मविश्वासाने बाहेर पडू शकत नाही. घरातील प्रत्येक क्षणाचा परिणाम तिच्या कर्तव्यावर आणि दिवसभरातील प्रत्येक घडामोडीवर पडत असतो. त्याची पत्नी त्याच्या पाठीशी खंबीर असते. तो डोंगराला धडक दयायला ही मागे सरत नसतो. आणि ज्या पतीचा चा घरात आदर होतो त्याचा समाजातही आदर होतो.

4. दोघांचे भांडण दोघातच ठेवावे. ते दोघातच असायला पाहिजे. पती पत्नीचे भांडण होणे सहाजिक आहे परंतु जेव्हा हे भांडण तिसऱ्याचा पर्यंत जाते तेव्हा त्याला फाटे फुटतात. एक सत्य गोष्ट असते की सोबत तर दोघांना राहतेच आहे मग, आपण यातील वाद बाहेर न काढता दोघांमध्येही ठेवायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचे सिक्रेट संपले की नात्याचा गोडवा कमी होतो. शिवाय इतरांच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज किंवा भांडण संपवण्या ऐवजी वाढू शकतात त्यामुळे कोणताही गुंता दोघातच सोडवायला हवा.

हे वाचा:   तुमचा अपमान होत असेल लोक किंमत देत नसतील, तर फक्त या सहा गोष्टी करा, पूर्ण जग तुमचा रिस्पेक्ट करेल…..!!

5. तुम्ही स्त्री आहात हे कधीच विसरू नका. अनेक वेळा नोकरी करणाऱ्या स्त्रियांना किंवा घरकाम करणाऱ्या महिलांना ही असं वाटत असतं की आम्हीच सर्व का करायचे? परंतु निसर्गाने स्त्रीला स्त्रीत्व बहाल केले ते जोपासायला हवा. आपण कितीही प्रयत्न केला तरी शारीरिक प्रकृती ठरलेले असल्याने समाजात वावरताना कर्तव्य बजावताना आणि मातृत्वाच्या कर्तव्यात पुरुषां सारख्या सर्व गोष्टी करणे शक्य नसते.

तेव्हा अशावेळी काही गोष्टी मान्य केल्यास आयुष्य जगणं सहज सोपं जातं प्रत्येक गोष्ट पती सोबत शेअर करा. दुःख आनंद यासोबतच पत्नी आपली स्वतःची चूक सुद्धा नवऱ्या सोबत शेअर करायला पाहिजे. संसारातील प्रत्येक गोष्ट ही घटना पतीसोबत शेअर करणारी पत्नी प्रत्येक पुरुषाला आवडत असते. यामुळे नाते घट्ट होत जाते, विश्वास वाढत जातो.

6. अपेक्षा आणि परिस्थितीचा विचार सुद्धा करायला पाहिजे. पत्नीला अनेक वेळा मोठा गिफ्ट व दागिने त्याचा मोह आवरत नाही आणि ही जरी सहाजिक गोष्ट असली तरीही पतीच्या खिशाचा आणि स्थितीचा विचार करणारे पत्नी पतीच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.

7. कधीच शेजाऱ्याची बरोबरी करू नये. कारण अनेक ठिकाणी ऐश्वर्य संपन्न आयुष्य असताना सुद्धा समाधान, आनंद नसतो. त्यामुळेच, प्रत्येक पत्नीने माझा संसार जगातील सगळ्यात चांगला संसार आहे ही मनाशी खूणगाठ बांधावी. पत्नीचा सर्वात मोठा दागिना नवरा आणि सर्वात मोठे ऐश्वर्या आपला संसार आणि मुले असतात. मित्रांनो नवरा-बायकोच्या नात्यांची वीण घट्ट राहण्यासाठी प्रत्येक नवरा बायकोने साशंक सुद्धा असू नये.

अशाप्रकारे या सात अपेक्षा नवऱ्याला तिच्या बायकोकडून असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *