नवरा बायकोच्या भांडणात माघार कुणी घ्यावी?….. हा नियम पाळा कधीच भांडण होणार नाहीत …!!

मनोरंजन

मित्रांनो, लग्न झालंय म्हणून नवरा बायकोचं नातं टिकूनच राहातं असं नाही. ते टिकून राहाण्यासाठी नातं हेल्दी असावं लागतं. आरोग्य सांभाळताना आरोग्यासाठी काय चांगलं काय वाईट हे आपण सतत माहिती करुन घेतो. जे चांगलं ते स्वीकारुन जे वाईट ते सोडत जातो. नवरा बायकोच्या नात्यातली सुदृढता टिकवून ठेवण्यासाठीही नेमकी याचीच गरज असते.

आणि अनेकदा अनेकांकडून याकडेच दुर्लक्ष होतं. संवाद हा कोणत्याही नात्यासाठी ऑक्सिजनचं काम करतो. नवरा बायकोच्या नात्यात तर प्रेम, विश्वास निर्माण करण्यात संवादाचा वाटा खूप मोठा असतो. पण संवादाचा विसंवाद होत असेल, भांडणाचं, विसंवादाचं कारणच संवाद असेल तर संवाद साधताना आपलं काय चुकतंय हे नवरा बायकोनं तपासून घ्यायला हवं. नवरा बायकोच्या नात्यांमध्ये जर सतत भांडणे होत असतील तर त्यामध्ये माघार कोण घ्यावी? त्यामुळे आपली मांडणी होणार नाही त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

जगात असा एकही देश किंवा एकही घर नाही जिथे नवरा बायकोचे भांडण होत नसेल! नवरा बायकोच्या भांडणाला कारणीभूत कोण? या प्रश्नाचे Unique उत्तर सांगणे शक्य नाही. आणि या प्रश्नाचे उत्तर आजवर कोणाला देता ही आली नाही. नवरा बायकोच्या भांडणाची जबाबदारी दोघेही झटकतातच. दोघांच्या भांडणात माघार कुणी घ्यायची? हा प्रश्न तर सर्वांना पडत असतो.

हे वाचा:   उधार दिलेले पैसे पुन्हा परत मिळत नसतील तर.. करा हा उपाय.. पैसे बुडवणारा स्वतः घरी येऊन पैसे परत करेल…..!!

संसाररथ दोघांशिवाय चालणे अशक्य आहे. सुखी आणि आनंदी संसाराला दोघेही आनंदी असणे आवश्यक आहे. भांडणाला असंख्य करणे असल्याने कुठल्या कारणाने भांडणाला सुरुवात होईल सांगता येत नाही. दोघांमधील भांडण दोघांमध्येच राहणे योग्य असते. तरी हा प्रश्न राहतोच. दोघांच्या भांडणात माघार घ्यायची कुणी?दोघांनाही संसार, मुलं बाळं प्रिय असतातच. परंतु अनेक वेळा भांडणामुळे परिस्थीती हाताबाहेर जाऊन संसाराचे वस्त्र उसवते.

भांडण चुकीने किंवा गैरसमजाने होत असते.भांडणाचे कारण काय आणि भांडण झाल्यानंतर माघार कोणी घ्यायची? हा प्रश्न बाजूला राहतोच. नवरा-बायकोच्या भांडणात माघार घ्यायची कुणी? म्हणून ज्याचे चुकले त्याने माघार घ्यावी. पण आता तुम्ही असे म्हणत असाल की चूक कोणाची हे कोण ठरवणार? तर नवरा किंवा बायकोला माहीत असत की स्वतःची चूक आहे किंवा नाही? व्यक्ती जगाला खोटं बोलेल, फसवेल परंतु स्वतःच्या अंतरमनाला स्वतःची चूक आहे किंवा नाही ते कळते.

हे वाचा:   प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोमध्ये ह्या ७ गोष्टी हव्या असतात…..अशी असावी बायको….!!!

स्वतःची चुक मान्य करण्यामध्ये अडथळा जर कोणी आणत असेल तर तो स्वतःचा इगो स्वतःचा अहंकार असतो. चूक मान्य केल्यास नवरा किंवा बायको डोक्यावर चढेल डोक्यावर बसेल ही एक प्रचंड मोठी भीती आणि मोठा गैरसमज एकमेकांच्या मनात गुप्त रूपाने दडलेला असतो. फक्त हे कुणी व्यक्त करत नाही. जिथे आयुष्यभर सोबत राहायचं, एकमेकाला समर्पित राहायचं, सुख दुःखात सोबत राहायचं, त्या व्यक्तीपुढे चूक असल्यास मान्य करण्यात कसला कमीपणा?

नवरा बायकोचे नाते म्हणजे पूर्णत्व असते. म्हणून ज्याची भांडणामध्ये चूक आहे त्याने समजुतीने माघार घ्यावे. भांडण पुढे वाढवू देऊ नये. कारण छोट्याशा पाडण्याचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ शकते आणि आपले नाते विस्कळीत होऊ शकते त्याचा परिणाम आपल्यावर तसेच आपल्या परिवारावर, आपल्या मुलाबाळा सर्वांवरच होत असतो. यात माघार घेणे हाच पर्याय आहे.

अशाप्रकारे हे जर तुम्ही उपाय केले तर नक्कीच तुमच्या नात्यांमध्ये दुरावा येणार नाही व तुम्ही सुखी व समाधानी राहाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *