मासिक पाळी किंवा पिरियड्स ही स्त्रीमध्ये सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया असली, तरीहि ती खूप जास्त प्रमाणात असेल तर टेन्शन येते. अनेक महिला आणि मुलींना मासिक पाळी दरम्यान इतका रक्तस्त्राव होतो की त्यांना दिवसातून अनेक वेळा पॅड आणि कपडे बदलावे लागतात. अशा स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. याबाबत ताबडतोब स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा. दर महिन्याला स्त्रिया भावनिक बदलांच्या टप्प्यातून जातात. ज्याचा परिणाम त्यांच्या हृदयावर आणि मनावरही होतो आणि त्याचबरोबर मित्रांनो जर अशा पद्धतीने स्त्रियांना जर जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर याच्या मागे अनेक कारणे असू शकतात.
मित्रांनो चुकीचे जीवनशैली आणि त्याचबरोबर जास्त प्रमाणात शेळ्या अन्नाचे सेवन केल्यामुळे आणि कमी झोप घेतल्यामुळे त्याचबरोबर अशाच अनेक चुकीच्या सवयींमुळे स्त्रियांना अतिरक्तस्राव यांसारख्या समस्याला सामोरे जावे लागते. तर मित्रांनो अशा वेळी आपण आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन यामध्ये सांगितलेले काही उपाय आपण आपल्या घरामध्ये नक्की करू शकतो.
यामुळे हा जो होणारा अतिरक्तस्त्राव आहे हा आपण कमी करू शकतो. परंतु मित्रांनो जर तुमचा रक्तस्त्राव आठ दिवस झाल्यानंतर तो थांबत असेल आणि पुन्हा थोड्या दिवसांनी होत असेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही हे उपाय तुमच्या घरामध्ये करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण मित्रांनो अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
तर मित्रांनो अशा वेळी आपण जास्त रक्तस्त्राव होत असेल तर अशावेळी मित्रांनो तुम्ही थंड पदार्थांचे सेवन जास्तीत जास्त प्रमाणात करायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो जे गव्हाचे पदार्थ असतात यांचेही सेवन तुमच्या आहारामध्ये तुम्हाला वाढवायचे आहे.
त्याचबरोबर मित्रांनो अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारामध्ये वरण-भात याचे प्रमाण वाढवायचे आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की, हे वरण-भात खात असताना आपल्याला त्यामध्ये थोडेसे तूप सुद्धा मिक्स करायचे आहे. मित्रांनो वरण-भात आणि एक ते दोन चमचा तूप आपल्याला घ्यायच आहे आणि याचे सेवन दिवसातून किमान एक ते दोन वेळा तरी आपल्याला करायचा आहे. मित्रांनो अतिरक्तस्त्राव कमी करण्यासाठी हेही पदार्थ आपल्याला खूप मदत करत असतात.
मित्रांनो ज्यावेळी तुम्ही थंड पदार्थांचे सेवन करायला सुरुवात करतात. तेव्हा तुमच्या रक्तामध्ये असणारे उष्णता कमी होते आणि त्यामुळेच जी गर्भाशयामध्ये इजा झालेली असते त्यामुळे जो रक्तस्त्राव होत असतो. तोही कमी होण्यास खूप मदत होते. म्हणूनच मित्रांनो अशा काळामध्ये तुम्ही थोड्या थोड्या अंतराने थंड पदार्थांचे सेवन नक्की करायला सुरुवात करा.
त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक अत्यंत प्रभावी उपाय करून या समस्येवर करू शकतो. तो म्हणजे आपल्याला सर्वात आधी एक कप डाळिंबचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मित्रांनो तुरटीची थोडीशी पावडर टाकायचे आहे. मित्रांनो ही तुरटीची पावडर टाकत असताना आपल्याला सर्वात अधिक तुरटी थोडीशी गरम करून घ्यायचे आहे.
गरम करून घेतल्यानंतर ती थोडीशी फुलते. ती फुलल्यानंतर त्याचे चूर्ण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि एक ते दोन चिमूट आपल्याला चूर्ण डाळिंबच्या रसामध्ये टाकायचे आहे आणि याचे सेवन मित्रांनो आपल्याला करायचे आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने या डाळिंबच्या रसाचे सेवन आपल्याला दिवसातून किमान दोन वेळा तरी करायचे आहे. मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला रक्तस्त्राव होतो आणि त्यानंतर पुढचा जो काळ येणार आहे म्हणजेच पुढचा रक्तस्त्राव होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
त्यानंतर मित्रांनो पुढचा जो उपाय आहे तो आहे दुर्वा संबंधित. मित्रांनो आपल्याला दुर्वांचा रस काढून घ्यायचा आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला दुर्वांचा रस काढणे शक्य नसेल किंवा दुर्वांचा रस निघत नसेल तर अशावेळी तुम्हाला थोड्याशा दुर्वा एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत.
त्यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला ओतायचं आहे आणि हे पाणी व्यवस्थितपणे उकळून घ्यायच आहे. हे एक ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळवायचे आहे आणि त्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे.
तर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले असे हे काही उपाय आहेत हे जर उपाय आपण केले तर आपल्याला मासिक पाळी दरम्यान होणारा अतीरक्तस्त्राव नक्कीच कमी करता येईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.