प्रत्येकाच्या घरात लिंबाचा वापर सर्रास करतोच. पण लिंबू पिळून झाल्यावर त्याचा रस काढून झाला कि आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहित आहे का लिंबाच्या सालीचे खूप उपयोग आहेत. जे तुम्हाला माहितीसुद्धा नसतील. लिंबाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचा वापर खाद्यपदार्थांपासून सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. इतकेच नाही तर लिंबाचा रस हे उत्तम क्लिनर म्हणून सुद्धा वापरलं जात. चला तर जाणून घेऊया लिंबाची साल न फेकून देता आपण त्याचा रोजच्या आयुष्यात कसा वापर करू शकतो.
तर मित्रांनो या लिंबाच्या साली फेकून न देता तुम्ही लिंबू पिळून झाल्यानंतर या साली एका डब्यांमध्ये ठेवून तुम्ही डब्बा फ्रीजला ठेवू शकता आणि ज्यावेळेस आपल्याला वापरायचे आहेत उपायासाठी त्यावेळेस तुम्ही काढून त्याचा वापर करू शकता.
तर मित्रांनो या लिंबाच्या ज्या काही साली आहेत या सालीचा वापर कसा करायचा हे आपण आता जाणून घेऊयात. तर मित्रांनो या ज्या लिंबाच्या साली आहेत याची बारीक बारीक तुकडे करून जर तुम्ही मिक्सरचे भांड्यामध्ये घातले आणि जरासे फिरवून घेतलं. तर यामुळे तुमचे जे मिक्सरचे भांडे असतं ते भांडे स्वच्छ होते. थोडेसे पाणी घालून तुम्हाला ही साल मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. यामुळे तुमचे मिक्सर चे भांडे चमकेल.
तसेच मित्रांनो लिंबाची साल ज्यावेळेस तुम्ही तुकडे करत असतात त्यावेळेस कात्रीला देखील धार होते. तसेच मित्रांनो लिंबाची जी काही साली राहिलेली आहे याचे बारीक बारीक तुकडे करून त्यामध्ये पाणी घालून हे पाणी आपल्याला उकळवायचं आहे. नंतर हे पाणी थोडसं थंड होऊ द्यायचा आहे आणि एका स्प्रेच्या बॉटलमध्ये तुम्हाला हे पाणी गाळून घ्यायच आहे.
त्यामध्ये मित्रांनो दोन तीन डिश वॉश लिक्विड चे दोन तीन थेंब टाकायचे आहेत. हे नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण लावायचे आहे. तर मित्रांनो यामुळे आपल्या ज्या काही घरातील ट्रॉली असतील कपाटे असतील ते साफ करण्यासाठी याचा खूपच फायदा होतो.
तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणारे चहाचे पातेले देखील अनेक वेळा ब्राऊन कलर झालेल असतं. तर मित्रांनो अशावेळी मित्रांनो तुम्ही लिंबाची साल घेऊन त्या पातेल्यातून फक्त फिरवायची आहे. म्हणजेच ते पातेलं घासल्यासारखं करायचं आणि पाच मिनिटात तसंच ठेवायचं आणि नंतर मित्रांनो या पातेल्याला धुवून घ्यायचं. खूपच चकचकीत होईल.
तसेच मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरामध्ये असलेले जे लाइटर आहे. हे देखील बऱ्याच वेळा खूपच चिकट झालेलं आपणाला दिसतं. तर मित्रांनो या लाइटरवर फक्त तुम्ही लिंबाची साल फिरवायची आहे. यामुळे त्या लाइटर वरचे जे काही डाग आहेत ते देखील निघून जातील आणि चिकटपणा देखील निघून जातो.
तसेच मित्रांनो लिंबाचा रस संपल्यानंतर ज्या काही साली राहतात. या साली तुम्ही एका डिशमध्ये ठेवून जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवला. तर यामुळे जो काही कोमट वास आपल्या फ्रीजमध्ये येत असतो तो देखील दूर होऊन जातो.
तसेच मित्रांन कुकरला देखील पांढरे डाग आपणाला पहावयास मिळतात. तसेच अनेक भांड्यांना, कढईला देखील पांढरे डाग पडतात. बऱ्याच ठिकाणी बोरचे पाणी असल्यामुळे देखील भांड्यांना पांढरे डाग पडत असतात. तर मित्रांनो अशा भांड्यांना तुम्ही जर या सालीने घासल्या म्हणजे या सालीने ते पातेले किंवा कढई जर तुम्ही घासली तर जे काही पांढरे निघून जातील.
म्हणजे तुम्हाला ही साल त्या भांड्यामध्ये फक्त फिरवायची आहे लिंबूची साल फिरवल्यानंतर तुम्हाला हे पाच मिनिटे तसेच ठेवायचे आहे. नंतर मग तुम्हाला धुवून घ्यायचे आहे. यामुळे सर्व पांढरे डाग निघून जातील.
बऱ्याच जण हे ग्रीन टी पीत असतात आणि जर तुम्हाला मित्रांनो यामध्ये लेमन फ्लेवर हवा असेल तर तुम्ही लिंबाची साल यामध्ये टाकायची आहे. कट करून देखील टाकू शकता किंवा अख्खी देखील टाकू शकता आणि नंतर तुम्हाला उकळवायचे आहे. यामुळे तुमच्या ग्रीन टी ला लेमन फ्लेवर नक्कीच येईल.
मित्रांनो आपण अनेक प्रकारच्या भाज्या कापत असतो म्हणजेच कांदा किंवा आणि इतर प्रकारच्या भाज्या ज्यांना उग्र वास असतो. म्हणजे त्या भाज्या कापल्यानंतर म्हणजेच कांदा कापल्यानंतर आपल्या हातांना वास येत असतो.
तर मित्रांनो हा वास घालवण्यासाठी मित्रांनो जी काही लिंबाची साल आहे ही साल आपल्या हाताला लावले म्हणजेच ते आपल्या हाताला चोळून घेतले तर यामुळे देखील जो काही उग्र वास आहे तो जातो.
बऱ्याच घरांमध्ये आपणाला स्टीलच्या पाण्याच्या चाव्या पाहायला मिळतात. तर मित्रांनो या स्टीलच्या पाण्याच्या चाव्या म्हणजेच नळ यावर अनेक पांढरे डाग निर्माण होतात किंवा काळपट पण आलेला असतो. तर मित्रांनो या साली जर तुम्ही या नळावरून फिरवल्या तर यामुळे देखील त्या चाव्यांना एक प्रकारची चमक येते.
बऱ्याच घरांमध्ये तांब्यांची भांडी आपणाला पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो जी आपण पितांबर वापरतो यामुळे देखील आपले हात काळसर होतात. तर मित्रांनो पितांबरी न वापरता तुम्ही जर या लिंबाच्या साली वापरून या तांब्यांच्या भांड्यांना घासल्या तर आपली तांब्याची भांडी चकचकीत होतील.
म्हणजेच मित्रांनो लिंबाची साल घेऊन आपणाला ही तांब्याची भांडी पहिल्यांदा घासायचे आहे आणि थोड्या वेळानंतर मित्रांनो भांडी घासण्याच्या चोथ्याने तुम्हाला परत ते तांब्याचे भांडे घासायचं आहे. यामुळे तांब्याची भांडी तुमची चमकतील.
तर मित्रांनो असे हे काही होते लिंबाच्या सालीचे उपाय. यामुळे मित्रांनो तुम्ही देखील लिंबूचा रस झाल्यानंतर त्या साली फेकून न देता फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि ज्या वेळेस लागतील त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करू शकता.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.