लाल बॉटल पाहून कुत्र्याची का फाटते…..लाल कलर च्या बाटलीला पाहून कुत्रे का घाबरतात?

ट्रेंडिंग

मित्रांनो, गावठी कुत्र्याला हुसकावलं तर ते जात नाही, काठी दाखवली तर गुरगुरल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या वावराला सरावलेली कुत्री कोणालाच दाद देत नाहीत. पण यावर एक गावठी उपाय शोधला आहे. तुझ्यामुळे गावठी कुत्री पळून जातील व कुत्रापासून होणारा त्रास आपल्याला होणार नाही. यासाठीच आज आपण हा उपाय कोणता याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

दारात एका बाटलीत लाल रंगाचे पाणी भरून ठेवलं की कुत्रे ती बाटली पाहून तिथे थांबत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळेच अनेक गावांत दारादारांत लाल रंगाच्या बाटल्या दिसत आहेत. अगदीच सांगायचं झालं तर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये अशा बाटल्या ठेवल्या आहेत. लाल रंगाचे आणि कुत्र्याचे वावडे काय? लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटलीला पाहून कुत्रे थबकते. आपली दिशा का बदलते, याचे शास्त्रीय कारण या क्षणी कोणीही सांगू शकत नाही.

हे वाचा:   जळालेले दुधाचे भांडे अजिबात मेहनत न करता चुटकीशीर साफ करा एका मिनिटांत या ट्रिक ने…..!!

पण भटक्या कुत्र्यांना रोखण्याचा उपाय म्हणून लाल रंगाचे पाणी भरलेल्या बाटल्या दारात, परसात, गोठ्याच्या दारात ठेवण्याचा उपाय कर्णोपकर्णी सर्वत्र पोहोचला आहे. त्यामुळे भटकी कुत्री दारात येत नाहीत. दारात घाण करत नाहीत, दारात भुंकत नाहीत. बहुतेक घराच्या चौकटीच्या किंवा अंगणाच्या तोंडालाच दोन्ही बाजूला दोन बाटल्या असे चित्र आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये तर चार दिशेला चार बाटल्या आहेत.

लाल रंगाच्या पाण्याला कुत्रे घाबरते, हा शोध किंवा निष्कर्ष कोणी काढला, याची कोणालाही माहिती नाही. पण एक बाटली घ्यायची, त्यात पाणी भरायचे, लाल रंग टाकायचा व ती बाटली दारात ठेवायची. त्याला काही खर्च येत नाही. त्यामागे काही दैवी चमत्कार नाही. त्यामुळे करून बघायला तरी काय हरकत आहे, म्हणून हा लाल रंगाच्या पाण्याचा प्रयोग सर्वत्र सुरू आहे. आणि कुत्र्याचा उपद्रव कमी झाला असा लोकांचा अनुभव आहे.

हे वाचा:   मोजून फक्त एक मिनिटात १००% या पाण्याने चमकवा कितीही जुनाट तांब्या आणि पितळेची भांडी घरच्या घरी …!!

बारी विद्यापीठाचे मार्सेल सिनसिंची यांनी सांगितले की, कुत्र्यांना लाल किंवा निळा रंग दिसत नाही. याचा अर्थ असा नाही की या रंगाची वस्तू त्यांच्या डोळ्यांसमोर तयार झालेल्या चित्रातून नाहीशी होते आणि त्या वस्तूच्या मागे काय आहे ते कुत्र्यांना दिसते. त्यापेक्षा रंगांधळेपणामुळे त्यांना निळा किंवा लाल रंग पाहण्यास त्रास होतो. म्हणूनच त्याला लाल किंवा निळा रंग असलेली जागा सोडायला आवडते. अनेक वेळा कुत्रे विनाकारण भुंकायला लागतात, याचे कारण रंग अंधत्व देखील असू शकते. एखादी वस्तू किंवा व्यक्ती लाल किंवा निळा रंग परिधान करून रस्त्याकडे जात आहे.

अशा प्रकारे लाल कलर च्या बॉटलीला पाहून कुत्र घाबरते का, याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *