हार्ट अटॅक येण्यापूर्वीची ही असतात प्रमुख तीन लक्षणे ; वेळीच व्हा सावधान नाहीतर ….!! सर्वांसाठी उपयुक्त अशी माहिती ……!!

आरोग्य

मित्रांनो, आजकाल बदलत्या वातावरणामुळे तसेच व्यस्त जीवन शैलीमुळे अनेक आजाराचा सामना करावा लागत आहे. कोणाचेही आपल्या आरोग्याकडे लक्ष राहिलेले नाही. पण मित्रानो हे आजाराकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ते आपले प्राणही घेऊ शकतात. आजच्या युगात हार्ट अटॅक ही जागतिक समस्या बनलेली आहे. याचे प्रमाणही खूप वाढलेले आहे.

मित्रांनो हार्ट अटॅकमुळे आणि हृदयाशी संबंधित आजारांमुळे भारतात दरवर्षी 30 लाख लोकांचा मृत्यू होतो. गेल्या पाच वर्षात हार्ट अटॅक मुळे मृत्यू पडणाऱ्यांचं प्रमाण हे तब्बल 53 टक्क्यांनी वाढले आहे. आज तर परिस्थिती अशी आहे की दर चार मृत्यू मागे एक मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे होत आहे. हे सर्व भयानक वास्तव पाहिल्यानंतर हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणे दिसतात का ? हा प्रश्न सहाजिकच आपल्या प्रत्येकाच्या मनात येतो. तर याच उत्तर आहे ‘होय’.

मित्रांनो आपले शरीर हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षणे दाखवते. जर हे लक्षण आपल्याला वेळीच समजली तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करा म्हणजे पुढचा अनर्थ टळेल. जीव वाचेल.

मित्रांनो चला तर जाणून घेऊया की, हार्ट अटॅक येण्यापूर्वी आपलं शरीर कोणकोणती लक्षणे दाखवते. हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीमध्ये विशेष करून छातीच्या मध्यभागी किंवा छातीच्या डाव्या बाजूला आणि क्वचित छातीच्या उजव्या बाजूला सुद्धा प्रचंड दाब पडल्यासारखा वाटत. जणू काही एखादी वजनदार वस्तू एखाद्या हत्ती सारखा मोठा प्रचंड दाब आपल्या छातीवर पडलेला आहे. तसेच श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. एक प्रचंड प्रेशर छातीवरती निर्माण होतं. अनेक जणांना आपलं हृदय दाबल्यासारखं वाटतं. हृदय पिळवटल्यासारखं होऊन छातीत वेदना होऊ लागतात. कळ यायला सुरू होते.

हे वाचा:   ब्युटी पार्लर चे हजारो रुपये वाचवणारा हिवाळ्यातील स्पेशल फेशियल पॅक एक वेळ लावा ; चेहरा गोरा नितळ, वांगाचे, डाग जाऊन चेहरा चंद्रा सारखा तेजस्वी सुंदर दिसेल .....!!

मित्रांनो छातीमध्ये सुरू झालेल्या वेदना कधी कधी डाव्या खांद्याकडे सरकतात. कधी कधी डाव्या खांद्याकडून त्या डाव्या हाताकडे आणि डाव्या हाताकडून बोटांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतात किंवा शरीराच्या वरच्या भागाकडे सुद्धा या वेदना पोहोचतात. छाती कडून मानेकडे, जबड्याकडे किंवा दातांकडे सुद्धा या वेदना जाऊ शकतात. अगदी काही रेअर केसेस मध्ये छातीपासून ते उजव्या खांद्याकडे या वेदना जाण्याची शक्यता असते. कधीकधी या वेदना छातीतून पाठीमागे आपल्या पाठीत सुद्धा जाताना दिसून येतात. काही वेळेस डाव्या हाताची मधल्या तीन बोटात खूप कळा येतात.

मित्रांनो अनेकदा अशा प्रकारच्या वेदना इतर आजारांमध्ये इतर रोगांमध्ये सुद्धा जाणवू शकतात. मात्र जर तुम्हाला असं वाटू लागलं की, असा अनुभव तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच येत आहे तर सर्वात प्रथम स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मित्रांनो काही वेळा आपण प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त जेवण करतो तेव्हा अपचन होतं. करपट ढेकर येतात. छातीत जळजळ होऊ लागते. हे आपण अनेकदा अनुभवलेलं असतं. जेव्हा हार्ट अटॅक येणार असतो तेव्हाची जी जाणीव वेगळीच असते. बऱ्याचदा रुग्ण प्रचंड घाबरतो. आता आपला जीव जाणार आहे अशी त्याची भूमिका ठाम असते.

हे वाचा:   मित्र मैत्रिणींनो तुम्ही ही रोज अंडी खात असाल तर ही महत्वपूर्ण माहिती खास तुमच्यासाठी, अंडी खाण्याचे फायदे आणि नुकसान ......!!

मित्रांनो, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे. मात्र जेव्हा जेव्हा महिलांमध्ये अटॅक येतात तेव्हा ते खूप सिव्हीयर caviar असतात आणि या अटॅकमुळेच महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. या प्रकारचे अटॅक कमी प्रमाणात येतात मात्र ते खूप घातक असतात. आणि म्हणून महिलांनी याकडे विशेष लक्ष द्यावे. जर आपल्याला थकवा जाणवत असेल, डायबिटीस नाही तरीसुद्धा थकवा जाणवत असेल, अस्वस्थ-बेचैन वाटत असेल नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी अस्वस्थता वाटत असेल तर त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

तसेच मित्रांनो हार्ट अ‍ॅटॅक येण्याची ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे किंवा कुटुंबामध्येच आपल्या वडिलांना, आईला, आत्याला, मामाला जर हृदयविकाराचा त्रास असेल तर अशा लोकांनी थोडसं सावध राहण आवश्यक आहे.

मित्रांनो जर स्मोकिंग- धूम्रपान, दारू पिण्याची सवय किंवा इतर वाईट गोष्टींची सवय असेल तर हृदयास संबंधित विकार होण्याची शक्यता जास्त असते. डायबिटीस असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेल असेल किंवा पोटावर चरबी साठली असेल अशा लोकांना वरील सांगितलेला त्रास होत असेल तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *