तुमच्याही घरात उंदीर आहेत का ? जाणून घ्या घरात उंदीर असणे शुभ आहे कि अशुभ……!!

अध्यात्म

मित्रांनो, घरांमध्ये कुत्रे, मांजर, पोपट इत्यादी पाळले जातात, तर उंदीर, चिचुंद्री, मुंग्या इत्यादी घरावर अधिराज्य गाजवतात. कधी कधी पक्षी किंवा कबूतरही घरटे बनवतात. यातील काही जीवांचे घरात राहणे शुभ असते तर काहींचे अशुभ. वास्तुशास्त्र आणि शकुन शास्त्रामध्ये या प्राण्यांपासून मिळणारे शुभ आणि अशुभ संकेत देखील सांगितले आहेत. यामध्ये घरात अनेकदा दिसणारे उंदीर आणि चिचुंद्री यांच्याबद्दलही शकुन आणि अपशकुन सांगितले आहेत.

उंदीर ही गणपतीची स्वारी मानली जाते. म्हणूनच ते धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जातात. काही मंदिरांमध्ये उंदरांची नियमित पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य पण दाखवला जातो. पण घरात उंदीर येणे हे चांगले लक्षण आहे का? घरात उंदीर येण्याबद्दल शकुन शास्त्र काय सांगते, याविषयी आजच्या लेखामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

उंदीर हे गणपतीचे वाहन मानले जात असले तरी ते जर तुमच्या घरात शिरले आणि बिळात राहू लागले तर ते तुमच्या भविष्यासाठी खूप अशुभ लक्षण आहे. असे मानले जाते की, तुमचे शत्रू सक्रिय झाले आहेत आणि ते तुमच्या विरोधात मोठे कट रचू शकतात. अशा स्थितीत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेतली पाहिजे.

हे वाचा:   ज्या घरात स्वामींचे 11 गुरुवार चालू आहेत त्या प्रत्येक स्वामीभक्ताने हा लेख नक्की वाचा प्रत्येक स्वामी भक्तासाठी अतिशय महत्वाची माहिती …..!!

काळे उंदीर हे बहुतेक घरांमध्ये दिसतात. काळे उंदीर मर्यादित प्रमाणात दिसणे हे सामान्य आहे, परंतु अचानक घरात काळ्या उंदरांची संख्या वाढली तर ती धोक्याची बाब आहे. उंदरांची संख्या अचानक वाढल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करा आणि नुकसानीबाबत सतर्क राहा. जास्त उंदीर देखील घरात नकारात्मकता आणतात.

घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते. वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो, असं मानतात. इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात. चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खातात. साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल. पण, चिचुंद्री थुंकी विषारी असते, त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते.चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच.

हे वाचा:   मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांना आलेला स्वामीचा हा सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

याशिवाय, चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे. दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते. त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते. चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते. अनेक संकटे संपतात.

अशाप्रकारे घरामध्ये चिचुंद्री व उंदीर येणे यामागे कोणकोणते लक्षण वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *