मित्रांनो आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे दात. आयुर्वेदामध्ये असे म्हटले जाते कि ज्याचे दात चांगले त्याची प्रकृती चांगली. पण याच दातांकडे आपण पाहिजे तितके लक्ष देत नाही. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की जेवल्यानंतर चूळ भरावी. तसेही कोणताही पदार्थ किंवा गोष्ट आपण खाल्ली तर त्यानंतर चूळ भरणे फार महत्त्वाचे आहे.
कारण मित्रांनो जेवल्यानंतर किंवा कोणतेही खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर काही अन्नाचे कण आपल्या दातात अडकून बसतात. काही अन्नकण दाताला चिकटून बसतात. हे जर रात्रभर दातावर असेच राहिले तर दात किडायला सुरवात होते. म्हणून जेवल्यानंतर चूळ भरावी. कोणतेही पदार्थ खाल्ले तर चूळ भरावी. रात्री झोपताना दात घासणे खूप आवश्यक आणि महत्त्वाचे आहे.
मित्रांनो दुधाचे दात पडल्यानंतर पुन्हा जे नवीन दात येतात त्या दातांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हे दात पडले तर पुन्हा येत नाहीत. म्हणून दातांच्या स्वच्छतेची विशेष काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. अन्यथा दात किडतात-सडतात आणि त्यानंतर ज्या वेदना होतात त्या आपल्याला असह्य होतात. यासाठी कोणताही पदार्थ आपण खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरणे खूप महत्त्वाचे आहे.
मित्रांनो दात स्वच्छ न केल्यामुळे काही वेळ किडून पडतात, सडतात, हिरड्या सुजतात व वेदना असह्य होतात. दवाखान्यात जाऊन खूप औषधे घेतली तरी हा त्रास कमी होत नाही. काही वेळा दाढ किंवा दात काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.
मित्रांनो काही लोकांना व्यसनाची सवय असते. त्यामुळे अशा लोकांचे दात लाल पिवळे झालेले दिसतात. असे लोक बोलताना आणि हसताना खूप वाईट दिसतात. काही लोकांना व्यसन करण्याची सवय असते. त्यामुळे दात लाल-पिवळे पडतात पण चारचौघात तोंड उघडायला अशा लोकांना लाजही वाटत असते. कारण कधीही स्वच्छ मोत्यासारखे दात सर्वांनाच आकर्षित करत असतात.
मित्रांनो वरील सर्व समस्यांसाठी आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत. त्यामुळे तुमची दाढदुखी कायमची पळून जाईल. दातातील किडे निघून जातील. चला तर पाहूया कोणता आहे तो उपाय. आयुर्वेदानुसार दंत रक्षणासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी भरपूर आयुर्वेदिक घरगुती उपाय सांगितलेले आहेत.
मित्रांनो यासाठी लागणारा पहिला घटक आहे लसुन. आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो. दात दुखत असेल दातात वेदना होत असतील तर वेदना कमी करण्यासाठी लसणाचा खूप मोठा फायदा होतो. दुसरा लागणारा घटक आहे हळद. हळदी मुळे हिरड्यांची सूज व वेदना कमी होण्यास मदत होते.
मित्रांनो या उपाय साठी लागणारा तिसरा घटक आहे मीठ. आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या आजारात कडूलिंबाचा वापर केला जातो. यामुळे दातांना कीड लागत नाही असेल तर निघून जाते. हिरड्या मध्ये रक्त येत नाही.
मित्रांनो मित्रांनो लसूण सोलून घ्या त्यातील दोन तीन पाकळ्यांचे तुकडे करून घ्या हे तुकडे प्रथम हळदीत आणि नंतर मिठात घोळून घ्या. हे मिश्रण कापसाच्या एका बोळ्यात घ्या आणि या पाकळ्या जो दात किंवा दात दुखत आहे त्याखाली थोडसं जाऊन दाढे खाली किंवा दुखर्या दाताखाली धरुन ठेवा. पंधरा ते वीस मिनिटं तसेच धरून ठेवा येणारी लाळ थुंकून टाका. थोड्या वेळानंतर तुमची दात दुखी दाढ दुखी थांबलेली असेल दातातील वेदना थांबतील.
मित्रांनो या दंतमंजन आणि आपण सकाळी आणि रात्री झोपताना दात घासावेत यामुळे तुमचे दात दगडासारखे घट्ट होतील. दातातील कीड निघून जाईल. दातांचे आरोग्य चांगले होईल. त्यामुळे दातावर सूज येणार नाही. दात मोत्यासारखे स्वच्छ सुंदर दिसतील.
मित्रांनो अचानक रात्री किंवा अवेळी दातदुखी सुरू झाली तर हा घरी करता येणारा आयुर्वेदिक उपाय दातांसाठी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना त्यामुळे या दंतमंजन चा लाभ आणि माहिती सर्वांनाच समजेल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.