मित्रांनो, आपल्यापैकी सर्वांनाच मांसाहार हा अतिशय प्रिय असतो. मांसाहाराचे आपल्या शरीराला खूपच फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. शरीराला अंडी ही अत्यंत फायदेशीर आहेत. परंतु काहीजणांना अशी सवय असते की, अंडी खाल्ल्यानंतर ते काहीतरी खात असतात. तर मित्रांनो आज या विषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे जी तुम्हाला माहित नसेल. मित्रांनो अंड खाणं कुणाला आवडत नाही. लहान मुलांमध्ये तर अंड्याचे पदार्थ खूप प्रिय आहेत. जसे की आमलेट, बुर्जी खांडोळी असे विविध पदार्थ आहेत. अंडी खाण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आपले शरीर मजबूत तसेच शरीरामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते.
मित्रांनो अंड्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. याला सुपर फूड देखील म्हंटले जाते. मित्रांनो अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात. रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात.शरीरातील विटामिन्सची कमतरता अंड्यांच्या सेवनामुळे कमी होते. डाएट करणाऱ्यांसाठी अंडी खाणे फायदेशीर असते. अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.
त्याचबरोबर मित्रांनो, गर्भवतींनी अंडी खाल्याने भ्रूणाची चांगली वाढ होते. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.अंडे आपल्या तब्येतीसाठी खूपच फायदेशीर आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात विटमिन्स, आणि प्रोटीन असते. ज्यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळते. जास्त करून लोक अंडे उकडून खातात. उकडलेले अंडे केवळ चविष्ट लागते असे नाही तर ते स्वास्थ्यासाठी देखील उत्तम आहे. परंतु, उकडलेले अंडे खाल्ल्यानंतर, काही पदार्थांचे सेवन करणे चुकीचे आहे. आज आम्ही तुम्हाला त्या 2 पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे उकडलेल्या अंड्यानंतर खाऊ नका. आणि उकडलेले अंडे साधारणपणे सकाळी नाश्त्याबरोबर खावे. म्हणजे शरीराला योग्य प्रमाणात प्रोटेन्स मिळतील. नाश्ता करताना १ किंवा २ अंडी तुम्ही खाऊ शकता.
मित्रांनो उकडलेले अंडे तुम्ही तळून सुधा खाऊ शकता. ते जास्त चविष्ट लागते. तुम्ही रात्रीच्या जेवणात ते खाऊ शकता. उकडलेले अंडे खाल्ल्यावर ह्या २ गोष्टी खाणे टाळले पाहिजे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहेत ते पदार्थ. मित्रांनो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दुध किंवा दही. उकडलेले अंड्याबरोबर किंवा अंडी खाऊन झाल्यानंतर दूध किंवा दह्याचे सेवन करू नये. यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिएक्शन होतात. परिणामी चेहरा विद्रूप होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर पांढरे डाग येण्याची शक्यता असते म्हणजे शरीरावर कोड येऊ शकते.
मित्रांनो, त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे लिंबू,लिंबू असे नेहमी पाहाण्यात आले आहे की, जे लोक उकडलेले अंडे खातात. ते त्यावर लिंबू पिळून घेतात. ज्यामुळे ते आणखी चविष्ट लागेल. पण असे करू नये. कारण तसे केल्याने रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते व हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अंडी आणि लिंबू हे दोन पदार्थ जेव्हा जठरामध्ये जाऊन या दोन पदार्थांचे मिश्रण होऊन त्यापासून घातक पदार्थ निर्माण होतात. याचा आपल्या हृदयावर आघात होऊ शकतो आणि परिणामी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
केळ: अंडे खाल्यानंतर केळ्याचे सेवन कधीही करू नये. त्यामुळे पोटाच्या तक्रारी उद्भभवू शकतात. जसे की बद्ध्हकोष्टता, अपचन, गॅस किंवा आतड्यांच्या समस्या उद्भभवू शकतात. म्हणूनच, अंडे खाल्ल्यावर केळ कधीही खाऊ नये. पण त्याचबरोबर, काही लोकांची शारीरिक प्रकृती अंडे खाण्यासाठी योग्य नसते. त्या लोकांना अंडे खाण्यामुळे एलर्जी, पोट फुगणे, या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा लोकांना अंडे साधे किंवा उकडून खाता कामा नये आणि त्याचबरोबर मित्रांनो अंड्यासोबत मासे, साखर, चीज, दही, दूध, ताक, चहा या पदार्थांचं सेवन करू नका. अन्यथा पोटाचे विकार होऊ शकतात.
यामुळे ऍलर्जी होऊ शकते. पित्त, मळमळ हा त्रास होऊ शकतो. म्हणून अंडासोबत किंवा अंड खाल्ल्यानंतर लगेच वरील पदार्थ खाण टाळा. तरच सुपरफुड अंड्याचा तुमच्या आरोग्यासाठी फायदा होईल. मित्रांनो केस आणि त्वचा यासाठी बायोटिन नावाच्या विटामिनची आवश्यकता असते. परंतु, कच्या अंड्यात एविडिन नावाचे प्रोटीन असते. ते शरीरातील बायोटिनला सहज कमी करते. म्हणून कच्चे किंवा उकडलेले अंडे योग्य प्रमाणात खाल्ले पाहिजे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.