किवी फळ खाण्यापूर्वी पुन्हा पश्चाताप होण्याआधी वेळात वेळ काढून एक वेळेस नक्की वाचा नाहीतर ……..!!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या आसपास असणाऱ्या परिसरात वनस्पती या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. या वनस्पतींचे पाने, फुले, फळे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी ठरतात. परंतु आपल्याला याची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याकारणाने आपण या वनस्पतींकडे दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. आज आपण किवी फळ खाण्याचे महत्त्वाचे फायदे या लेखामधून जाणून घेणार आहोत. किवी फळ अंड्याच्या आकाराचे व तपकिरी रंगाचे असते.हे फळ आपण अनेक वेळा बाजारात पाहिले असेलच. किवी फळ बाहेरून तपकिरी रंगाचे दिसते मात्र कापल्यानंतर आतून हिरव्या रंगाचे असते. मित्रांनो अशा या किवीला आत्ताच्या काळामध्ये वेगळीच आणि विशेष ओळख निर्माण झालेले हे फळ आहे. किवी फळ आवडीने खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे फळ नक्कीच खाल्ले पाहिजे.

मित्रांनो तुम्ही तर अजूनही हे किवीचे फळ खाल्ले नसेल तर आजचा लेख वाचल्यानंतर तुम्ही एक वेळ हे फळ नक्कीच खाल.या फळांमध्ये 27 पेक्षा जास्त पोषकतत्वे आढळतात तसेच विटामिन,फायबर, पोटॅशियम भरपूर असते त्याचबरोबर या प्रकारचे फळाचे औषधी फायदे आपल्या शरीराला होत असतात.

या फळाची शेती थंड हवेच्या डोंगराळ भागात केली जाते. चला तर मग आपण जाणून घेऊया हे फळ खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात. मित्रांनो किवी फळ आपल्या शरीराला फार उपयुक्त असते. सर्व आजारांना दूर ठेवण्यासाठी हे फळ अवश्य सेवन करावे. कारण आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सी विटामिन गरजेचे असते.

हे सी विटामिन या फळात खूप प्रमाणत असते. किवी फळ हे डोळ्याच्या उत्तम दृष्टी ठेवण्यासाठी फार उपयुक्त मानले जाते त्यामुळे डोळे दीर्घकाळ कार्यक्षम ठेवण्यासाठी नियमित किवी फळ खावे. या किवी मध्ये असे काही घटक असतात जे निद्रा नाश उपचारासाठी फार गुणकारी ठरते त्यामुळे तुम्हाला निद्रा नाश ही समस्या असेल, रात्री उशिरापर्यंत झोप लागत नसेल तर तुम्ही रोज झोपण्यापूर्वी एक ते दोन किवी फळे अवश्य खावी.

हे वाचा:   मटण खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ ; नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल ! अत्यंत उपयुक्त अशी माहिती

ज्याने तुम्हाला निवांत झोप लागेल. शरीरातील ऊर्जेची गरज भागवण्या बरोबरच त्यातील खनिज शरीराच्या वाढीला आवश्यक असतात ज्यामुळे शरीर मजबूत होण्यास फार उपयुक्त असते शिवाय यामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

मित्रांनो फ्री रॅडिकल्स किंवा आदी रसायनांमुळे अनेक वेळा हृदयरोग कॅन्सर मोतीबिंदू संधिवात लक्षणे दिसून येतात किंवा नैसर्गिक स्रोत असल्याने फ्री रेडिकल चा प्रभाव कमी करण्यास हे किवी फळ फार फायदेशीर ठरते. किवी फळ बॅड कोलेस्टेरॉल कमी करते सोबतच गुड कोलेस्ट्रॉल वाढवते.

ज्यामुळे आपल्या शरीरातील धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढत नाही आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो त्यामुळे या किवीचे नियमित सेवन करावे. विटामीन अ, विटामीन बी आणि कॅल्शियम,मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असतात.

अनेक प्रकारच्या समस्या पासून बचाव करण्यासाठी उपयोगी असतात त्यामुळे नियमित किवी फळ खा.हे फळ खाल्याने पचनक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी देखील किवीचे फळ नियमित खावे.यात फायबर मुबलक प्रमाणात असते जे पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतात.

कीवी मधील विटामिन सी व विटामिन ए केसांना अकाली पांढरे होण्यापासून बचाव करते शिवाय यामध्ये केस गळती, केस तुटणे या समस्या देखील होत नाही. शिवाय यामध्ये मॅग्नेशियम, जस्त सारखे खनिजे असतात. त्यामुळे नवीन केस उगवण्यासाठी देखील मदत होते म्हणजेच केसांच्या उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

हे वाचा:   लाखो लोकांनी या घरगुती उपायने आपले डागळलेले, पिवळसर दात पांढरे शुभ्र केले आहेत या घरगुती उपायने .....!!

कीवी हे फळ हिमोग्लोबिन निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते म्हणूनच तुम्हाला जर अशक्तपणा वाटत असेल आणि तुम्हाला रक्ताची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही किवीचे फळ नियमितपणे आवश्य खायला पाहिजे. गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या काळात अनेक प्रकारची पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. त्याची पूर्तता हे फळ नक्की पूर्ण करू शकते.

पोटात वाढणाऱ्या बाळाला पोषक घटक यांची आवश्यकता असते आणि हे फळ यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर तुम्हाला बद्घकोष्टता समस्या उद्भवते अशा वेळी हे फळ सेवन अवश्य करा. विटामिन्स सी, विटामिन्स ई योग्य प्रमाणात असलेले हे किवी फळ वजन कमी करण्याचे देखील काम करते.

असे हे बहुगुणकारी किवी चे फळ खायला आजपासून सुरुवात करा काही वेळा काही व्यक्तींना या फळाच्या सेवनाने एलेर्जी देखील होऊ शकते यासाठी आपण आधी थोड्या प्रमाणात फळे खाऊन पहावे काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मित्रांनो ज्या लोकांना किडनीची समस्या आहे. त्यांनी किवी फळ खाणे टाळावे. किवीमध्ये पोटॅशियम असते, ज्यामुळे किडनीच्या आजार वाढण्याची शक्यता असते आणि ठराविक प्रमाणात किवीचे सेवन करणे त्वचेसाठी चांगले असते, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्वचेचे विकार होऊ शकतात. यामुळे एक्जिमा, त्वचेवर पुरळ आणि सूज आणि ओठ आणि जीभ सूज येऊ शकते. जर तुम्हाला त्वचेची अॅलर्जी असेल तर त्याचा वापर पूर्णपणे टाळा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *