मित्रांनो, आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि धकाधकीच्या या जीवनात प्रत्येक जण हा व्यस्त झालेला आपणाला दिसून येतोय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणालाही वेळ नाही. त्यामुळे मग आपणाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. मग आपणाला डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा लागतो आणि त्यासाठी आपणाला भरपूर पैसे मोजावे लागतात. मित्रांनो सर्दी, खोकला तसेच कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल संधीवात असेल, डोकेदुखी असेल यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला म्हणजेच डॉक्टर जे सांगतील ते औषधे आपण घेत असतो. पण मित्रांनो आपल्या परिसरात असणाऱ्या अशा काही वनस्पती देखील आहेत त्यांचा जर तुम्ही वापर केला तर यामुळे तुमच्या या समस्या चुटकीसरशी निघून जातील.
मित्रांनो, आपणाला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींचा आपल्या आयुर्वेदामध्ये कसा वापर करायचा हे माहीत नसल्याकारणाने त्या वनस्पती नेमक्या कोणत्या आहेत? त्यांचा वापर कसा करायचा? हे आपणाला माहीत नसते आणि त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करीत असतो. तर मित्रांनो आज मी एक तुम्हाला अशी एक वनस्पती सांगणार आहे ही वनस्पती आपल्या वेगवेगळ्या प्रकारांच्या आजारांवर फायदेशीर ठरणार आहे.
तुमची डोकेदुखी असेल किंवा संधिवात असेल, खोकला असेल, सतत शिंका येत असतील तर यावर ही वनस्पती खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण या वनस्पतींच्या पानांमध्ये एंटीऑक्सीडंट तसेच जिवाणूंच्या वाढीसाठी नष्ट करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे ही कमालीची आयुर्वेदिक वनस्पती आहे.
तर मित्रांनो ही वनस्पती आहे घाणेरी वनस्पती. विविध भागात याला वेगवेगळ्या प्रकारची नावे देखील आहेत. तर मित्रांनो अनेकांना डोकेदुखीचा त्रास खूपच होत असतो. काही केल्याने त्यांचे डोके दुखणे कमी होत नाही. तर मित्रांनो अशा वेळेला तुम्ही काय करायचे तर या घाणेरी वनस्पतीची दोन-तीन पाने घ्यायची आहेत आणि ही पाने हातावर चुरगळायची आहेत आणि या वनस्पतीच्या पानांचा वास तुम्हाला पाच ते सहा वेळा घ्यायचा आहे. तुमची जी काही डोकेदुखी आहे ती चुटकीसरशी गायब झालेली तुम्हाला नक्की जाणवेल.
तसेच तुमच्या मनावरचा ताण देखील कमी झालेला तुम्हाला जाणवेल. मित्रांनो जेव्हा आपले डोके दुखते त्यावेळेस आपण विविध प्रकारचे बाम लावतो किंवा महागडे औषधे, गोळ्या घेत असतो. तर मित्रांनो कमी खर्चिक असा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. डॉक्टरांकडे न जाता तुम्ही हा उपाय जर केला तर तुमची कायमस्वरूपी जी काही डोकेदुखी असेल ती पूर्णपणे कमी होऊन जाईल.
तसेच मित्रांनो अनेकांना ऍलर्जीचा त्रास असतो म्हणजे सतत शिंका येणे, सर्दी होणे, खोकला हा त्रास होत असतो. तर अशा वेळेला तुम्ही मित्रांनो घाणेरी या वनस्पतीची तीन ते चार पाने घ्यायचे आहेत म्हणजे एकदम कोवळी पण घ्यायची नाहीत आणि एकदम जुनाट झालेली पण घ्यायची नाहीत. मध्यम असलेली पान तुम्हाला घ्यायची आहेत. ही तीन-चार पान तुम्हाला घाणेरी वनस्पतीची घ्यायची आहेत. ही पाने तुम्ही धुवून घ्यायची आहेत.
स्वच्छ धुऊन घेऊन तुम्हाला दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला ही पानं तोडून टाकायची आहेत म्हणजे छोटे छोटे भाग करायचे आणि टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला उकळायचं आहे. कारण ही पान आपण तसेच चावून खाऊ शकत नाही. कारण हे पान जरा खरबरीत असल्यामुळे आपल्या जिभेला इजा होऊ शकते. म्हणून मित्रांनो तुम्हाला दोन कप पाण्यामध्ये ही पानं टाकायची आहेत आणि उकळून घ्यायची आहेत.
मित्रांनो याचा रंग लाल होईपर्यंत तुम्हाला हे पाणी उकळून घ्यायच आहे. तुम्ही थोडं फार चवीपुरतं मीठ देखील यामध्ये टाकू शकता. नंतर हे पाणी तुम्हाला लाल कलर झाल्यानंतर गाळून घ्यायच आहे आणि तुम्ही जसे चहा पितात किंवा जरासं थोडं फार पाणी कोमट झाल्यानंतर हे पाणी तुम्ही प्यायच आहे. असे हे एक कप तुम्ही पाणी सलग पाच दिवस दिवसभरात कोणत्याही वेळेस घ्यायच आहे.
यामुळे तुमच्या ज्या काही शिंका येणे असेल किंवा सर्दी होणे किंवा खोकला सततचा असेल तर यावर खूपच फायदेशीर ठरणार आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर रक्ती मूळव्याध असेल म्हणजेच मुळव्याधामधून रक्त पडत असेल त्यावेळेस आपल्याला भरपूर त्रास सहन करावा लागतो. अनेकांना असा हा त्रास होत असतो. तर अशा वेळेस मित्रांनो तुम्ही या घाणेरी वनस्पतीची तीन-चार पाने घ्यायचे आहेत. स्वच्छ धुऊन घ्यायची आणि दोन कप पाणी घ्यायचं.
त्यामध्ये पानाचे बारीक बारीक तुकडे करून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हे पाणी तुम्हाला उकळायचं आहे. चवीपुरतं तुम्ही मीठ टाकू शकता आणि लाल कलर येईपर्यंत उकळून झाल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आणि कोमट झाल्यानंतर तुम्हाला प्यायचं आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला हे सकाळी उपाशीपोटी घ्यायच आहे. एक कप पाणी दररोज तीन दिवस तुम्ही हे उपाशी पोटी घ्यायच आहे.
यामुळे तुमचे जे काही रक्ती मूळव्याध असेल म्हणजे मुळव्याधामधून रक्त पडत असेल तर ते पूर्णपणे कमी होईल. सलग तुम्ही तीन दिवस हा उपाय केल्यामुळे रक्ती मुळव्याध पूर्णपणे कमी झालेला तुम्हाला नक्कीच जाणवेल.
मित्रांनो संधीवातावर देखील या घाणेरी वनस्पतीची पाने अतिशय फायदेशीर ठरतात. मित्रांनो या घाणेरी वनस्पतीच्या पानाचे चूर्ण करून म्हणजे ह्याची पेस्ट करून करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट तुम्ही थोडीफार हलकीशी गरम करायची आहे आणि जी काही तुमची गुडघेदुखी असेल किंवा संधिवात असेल या ठिकाणी ही पेस्ट तुम्हाला कपड्याच्या साह्याने बांधायची आहे.
तुम्ही चार-पाच दिवस हा उपाय करून पहा. त्यामुळे तुमची गुडघेदुखी आणि संधिवाताची जी समस्या आहे ती पूर्णपणे गायब होईल. घाणेरी वनस्पतीच्या पानांचा रस काढून जर तुम्ही जखमेवर लावला तर जुन्यात जुनी असलेली जखम देखील भरून निघेल. तसेच मित्रांनो ही घाणेरी वनस्पतीची पाने जर वाळवून तुम्ही धान्यांमध्ये ठेवली तर धान्यांना कीड देखील लागत नाही.
तर मित्रांनो तुम्हाला जर डोकेदुखीचा त्रास खूपच सहन करावा लागत असेल तर तुम्ही या डोकेदुखीवर कोणत्याही प्रकारच्या गोळ्या न खाता या घाणेरी वनस्पतींचा वापर जर केला तर यामुळे तुमची डोकेदुखी नक्कीच गायब झालेली तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो अशी ही चमत्कारिक वनस्पती खूपच आपल्याला आयुर्वेदामध्ये फायदेशीर ठरते. तर अशा या वनस्पतीचा तुम्ही वापर नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.