सुंदर विचार… आपला जोडीदार जिथे चुकतो तिथे त्याच्यासोबत रहा, असे केल्यास संसार सुखाचा होईल ?

मनोरंजन

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये काही असे प्रसंग येतात की ज्यामुळे माणसांचे मन अत्यंत दुखी होऊन जाते. आणि या दुःखी मनातून त्यांना जर पूर्ववत कोण आणत असेल तर ते म्हणजे सुंदर सुविचार. सुंदर सुविचार यांचा माणसाचा मनावर खूप चांगला परिणाम होत असतो. आणि त्यातून माणूस वाईट काळात बाहेर पडत असतो. म्हणूनच आज आपण काही सुंदर सुविचार जाणून घेणार आहोत.

तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलाच खोडरबर जिभेवर चालत नाही.

अहंकाराची उडी काय कामाची नसते कारण वेळ आली की टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम होतो ..!

जर कोणीतरी तुम्हाला एखादी चांगली संधी देत असेल आणि आपण ते करू शकू असा तुम्हाला विश्वास वाटत नसेल, तर हो म्हणा ते कसं करायचं हे नंतर शिका.

शारीरीक आणि आर्थीक प्रगती करण्यासाठी पहाटेचे मित्र वाढवा, आणि रात्रीचे मित्र कमी करा…..

“परिस्तितीची कावड” खांद्यावर पडली की पोटाची “काशी” यात्रा सुरू होते…!

कठीण प्रसंगात कासवाप्रमाणे पाठीच्या ढालीत सर्व अवयव ओढून घेऊन, प्रसंगी दणके सुद्धा खावे लागले तरी चालेल. परंतु योग्य वेळ येताच सापाप्रमाणे फणा वर काढणेच इष्ट ठरते.

खूप चटके सोसल्या वरच कडकपणा येतो मग तो चहा असो की आयुष्य..

आहे त्यात समाधान आणि नाही त्यासाठी प्रयत्न, ही मनाची बैठक पाहिजे.

प्रेमळ हृदायाची माणसे कितीही भांडण झाले तरी स्वतः हून परत परत बोलायचा प्रयत्न करतात. कारण प्रेमळ माणसानां अबोलण्याची धग सोसवत नाही.

सरक आणि स्पष्ट बोलत असाल तर एकच पुरस्कार मिळतो…. तू म्हणजे भांडखोर…

मुलीची सासरी पाठवणी करताना तिला अवश्य सांगा, माणसाबरोबर लग्न लावून दिलंय पण जर तो माणूस जनावर निघाला तर बिनधास्त माहेरी परत ये… कारण लग्न परत होऊ शकतं पण अश्या स्वार्थी, लालची माणसामुळे जीव गेला तर तो परत मिळणे शक्य नाही.

कर्मात गद्दारी, कार्यात बेइमानी, वागण्यात लाचारी, बोलण्यात लबाडी जी माणसे करतात, आयुष्यात ती कधीच सुखी नसतात.

हे वाचा:   स्वार्थी मतलबी स्त्रीची 18 लक्षणे….. अश्या स्त्रियापासून सावध रहा?

प्रतिभा परमेश्वराकडून मिळते, म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक रहा. प्रतिष्ठा समाजाकडून मिळते, म्हणून समाजाचे आभारी रहा. परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो त्यापासून सावध रहा.

दुसऱ्याचा द्वेष करण्यातच वृत्तीमुळे माणूस कधीच सुखी होत नसून त्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ्य मात्र गमावून बसतो.

“आयुष्यात प्रत्येक ठिकाणा पैसा कामी येत नाही, माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्वाचा असतो..”

आयुष्यातील सर्व शर्यती फक्त अतिरिक्तसाठी आहेत. जादा पैसा, जादा ओळख, जादा कीर्ती, जादा प्रतिष्ठा, जादा मिळवण्याची हौस नसेल तर आयुष्य खूप साधं आहे, मजेत आहे.

चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.

चुकलेल्या वाटा आपल्याला नव्या नाहीत, खरं अप्रूप तर ध्येयापर्यंत पोहोचवणाऱ्या रस्त्यांचं आहे…

येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी असतो त्याबाबत आपण किती प्रयत्नशील असतो यावरून आपल्या आयुष्याचा मार्ग ठरत जातो.

कधी-कधी ज्या गोष्टी आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत त्या गोष्टी हृदयाने दिसतात पण त्यासाठी तुमच्या कडे हृदय असायला हवे…!

ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे, असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही.

कुठं जिंकायचं आणि नक्की कुठल्या क्षणी हरायचं, हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं. कारण अशा व्यक्तीच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेला असतो.

हे सद्‌गुरू नाथा प्रेमाने भरलेले डोळे दे. श्रध्देने झुकणारे मस्तक दे. मदत करणारे हात दे. सत् मार्गावर चालणारे पाय दे. नामस्मरण करणारे मन दे. आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसाऊ दे,

आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी, कधीही लबाडी करू नये. कारण… ती कालांतराने उघड होते, व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात, आणि पायावर घेतली, तर तोंड उघडे पडते, म्हणून माणसाने आपल्या विचाराशी, व आचाराशी ठाम राहावे.

आयुष्यात प्रत्येक माणसावर वाईट वेळ किंवा घटना कधी येईल हे सांगणे कठीण आहे आणि एखाद्यावर वाईट वेळ आलीच तर आयुष्याच्या त्या सत्याचा सामना करुन देते ज्याची आपण चांगल्या वेळेतही कल्पना केली नसेल, त्यामुळे माणसाला आपला समतोल राखता आला पाहिजे मग वेळ चांगली किंवा वाईट असो …!!!

हे वाचा:   पूर्ण आयुष्य सुखाने आणि आनंदाने संसार कराल, फक्त नवरा बायकोने ह्या ४ गोष्टी कधीच चुकूनसुद्धा करू नका….!!

मनासारखी एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो.suvichar विरोधात घडली की दुःखी होतो. आणि स्वतःविषयी नाराज होतो, पण आयुष्य हे असेच असते. सुखदुःखाचे हेलकावे घेत चालावे लागते. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होते. आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते…. इंद्रधनुष्य फुलवण्याची.

कोणालाही तुमचं दुःख जाणवत नाही जोपर्यंत तुमच्या दुःखाचं रूपांतर रागात होत नाही आणि जेव्हा तुमच्या दुःखाचं रूपांतर रागात होतं तेव्हा मात्र प्रत्येकजण तुमचा राग राग करू लागतो.

टेंशन, डिप्रेशन, अस्वस्थता, बेचैनी. माणसाला तेव्हाच येते, जेंव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो….

कुठलही काम करण्यापूर्वी आपल्या चांगल्या कर्माची मनापासून आठवण काढा, प्रत्यक्षात परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल…

” समर्थक ” कमी झाले तरी चालतील पण” विरोधकांची” गर्दी कमी होता कामा नये.. कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो..

हुशार लोकांना कामावर घेऊन काय करायचं हे त्यांना सांगण्यात काहीही अर्थ नाही. आम्ही हुशार लोकांना कामावर घेतो, जेणेकरून आम्ही काय करायचं हे ते सांगू शकतील.

कुणाचं जर काही चांगलं होत असेल तर आपण का वाईट विचार करायचा आयुष्य हा प्रवास असतो स्पर्धा नाही.

प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अशी Someone special व्यक्ती असते त्याच्या दिसण्याने – बोलण्याने आपल्या चेहर्यावर ४४० volt ची Smile येते.

दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्या सोबत राहतं…!!! सुख वाफे सारखं असतं घडीभर रेंगाळत… आणि बघता बघता उडुन जातं…!!!

“इतरांनी आपल्याला हृदयात ठेवावे असे वाटत असेल तर तीन गोष्टींमध्ये कधीच बदल करू नका चांगले विचार, सत्यता आणि जीव लावणारी माणसं”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *