ह्या ७ सवयींनमुळे, लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत? आणि तुम्हाला किंमत पण देत नाहीत ..!!

मनोरंजन

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जर व्यक्तीला कोणती गोष्ट महत्त्वाच्या असेल ती म्हणजे आदर, सन्मान.. प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपल्याला समाजामध्ये आदर, सन्मान, मान मिळावा. इतर व्यक्ती आपली रिस्पेक्ट करावी. जर तुमच्या आयुष्यामध्ये लोक तुमची रिस्पेक्ट करत नसतील. तुम्हाला इग्नोर करत असतील आणि याचे कारण तुम्हाला समजत नसेल तर आजच्या या लेखांमध्ये आपण काही अशा 7 सवयी पाहणार आहोत की ज्यामुळे लोक आपले रिस्पेक्ट करत नसतात. त्या सवयी आपल्याला सुधारायला हवा. या सवयीन बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

या सात सवयी असा आहेत की ज्या आपल्याकडून कळत नकळत होत असतात आणि त्याचा प्रभाव हा इतर व्यक्तींवर होत असतो व आपल्या जीवनावर देखील होत असतो त्यामुळे इतर व्यक्ती आपल्याला इग्नोर करत असतात आणि आपल्याला हवा तितका रिस्पेक्ट मिळत नाही मान सन्मान मिळत नाही आदर मिळत नाही जर आपण या सात सवयी सुधारल्यात तर नक्कीच आपल्याला इत्तरां कडून रिस्पेक्ट मिळेल त्याचबरोबर लोक आपले इतके चाहते होतील की त्यांना आपल्या सोबत राहणे आवडू लागेल ते आपल्या शिवाय राहुच शकणार नाही

त्यातील पहिली सवय म्हणजे तुम्ही समाजाचे बोलणे ऐकून घेत नाही. आपल्या सभोवताली काही अशा व्यक्ती असतात की ज्या व्यक्ती आपले बोलणे बोलतच राहतात. परंतु समोरच्या व्यक्तीचे बोलणे त्यांना ऐकायचं नसतं आणि हेच इतरांना आवडत नसते. यामुळे लोक तुम्हाला इग्नोर करत असतात. लोकांना अशाच व्यक्ती आवडतात ज्या आपले देखील ऐकून घेतील व आपण देखील त्यांचा ऐकून घेऊ. जर आपण त्यांचे संपूर्ण बोलणे झाल्यावर आपले बोलणे बोलले तर नक्कीच ते आपल्याला रिस्पेक्ट देतील.

दुसरी सवय म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे. आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात की ज्या प्रमाणापेक्षा अति बोलत असतात आणि अशा व्यक्ती कोणालाही आवडत नसतात. कारण त्यांची बडबड ही विनाकारण चालूच असते आणि अशी व्यक्ती कोणालाही आवडत नसते. त्यांच्या बडबडण्याने इतरांना कंटाळा होत असते आणि अशाच मुळे लोक त्यांना रिस्पेक्ट देत नाही. म्हणून आपण आपला बोलण्याकडे परीक्षण करावी की आपण जास्त बोलत नाही ना. कारण जास्त बोलणाऱ्या व्यक्तींना कधीही लोक रिस्पेक्ट देत नसतात. जर आपण प्रमाणात बोललो तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देऊ लागतील.

हे वाचा:   जी स्त्री परपुरुषासोबत संबंध ठेवते, अशी स्त्री नवऱ्यासमोर हे ३ नाटक जरूर करते… पुरुषांनी जरूर वाचा …!!

तिसरी सवय म्हणजे इतरांची सतत निंदा करणे. काही व्यक्ती अशा असतात की त्या कायम इतरांच्या निंदा करत असतात. एखादी व्यक्ती वाईट असेल तर तिची निंदा केली जाते. परंतु प्रत्येक व्यक्तींबद्दल निंदा करणे ही सवय अत्यंत वाईट आहे. आपण जर सतत इतरांच्या निंदा करत राहिलो तर आपल्या सोबत कोणीही राहणार नाही. कोणीही आपल्याला रिस्पेक्ट देणार नाही. कारण त्यांच्या मनात असेल की ही व्यक्ती सतत इतरांची निंदा करत असते कशावरून ही आपली देखील निंदा करत नसेल. असे म्हणून ते आपल्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत असतात व आपल्याला इग्नोर करत असतात. म्हणून आपण इतरांची निंदा करू नये. तरच व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देतील.

चौथी सवय म्हणजे स्वतःची चूक कधीही मान्य करत नाही. काही व्यक्ती असा असतात की त्या आपली चूक झालेली कधीही मान्य करत नसतात. परंतु इतरांच्या नेहमी चुका काढत असतात. त्यांनी कोणतेही काम करू दे त्यामध्ये कोणती ना कोणती चूक ते शोधूनच काढत असतात. अशा व्यक्तींपासून लोक दूर राहत असतात. कारण ते आपण किती बरोबर आहेत हेच दाखवत असतात व इतर किती चुकीचे आहेत हे सांगत असतात. म्हणून असे लोक इतरांना आवडत नाही. त्यांना लोक रिस्पेक्ट देत नाही. म्हणून इतरांच्या चुका दाखवण्यापेक्षा आपण कुठे चुकत आहोत त्याच्याकडे लक्ष द्यावे. तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील.

पाचवी सवय म्हणजे कायम मला वेळ नाही असे म्हणणे. वेळेला महत्त्व देणे हे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्येक वेळी इतरांसाठी सदैव वेळ देणे हेही चुकीचे आहे. परंतु प्रत्येक वेळी जर आपण असेच म्हणत राहिले की मला वेळ नाही. तर आपण कितीही यश कमावले तर त्या यशामध्ये आनंदामध्ये सामील होण्यास तो साजरा करण्यासाठी आपला सोबत कोणीही राहत नाही. म्हणून प्रत्येक वेळी कधीही असे म्हणू नये की मला वेळ नाही. वेळात वेळ काढून आपण आपल्या मित्रांना भेटायला जावे. नातेवाईकांना भेटायला जावे. तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील.

हे वाचा:   कोणी सारखा सारखा अपमान करत असेल, तेव्हा फक्त ह्या ५ गोष्टी शिका…… परत कोणाची हिम्मत होणार नाही तुमचा अपमान करायची ?

सहावी सवय म्हणजे स्वतःबद्दल बढाया मारणे. आपले मिळालेले यश इतरांना सांगणे हे चुकीचे नाही. परंतु स्वतःची इतकी स्तुती करणे की इतरांना आपण कमी लेखू लागतो. त्यामुळे लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतात. कारण लोकांना अशा व्यक्ती अजिबात आवडत नाही की ज्या व्यक्तीस कायम स्वतःबद्दलच स्तुती करत असतात. स्वतः किती महान आहोत तेच सांगत असतात. अशा व्यक्तींना लोक कधीही रिस्पेक्ट देत नाही. म्हणून स्वतःबद्दल बढाया मारणे. ही सवय सोडून द्यावी. तरच लोक आपले रिस्पेक्ट करू लागतील.

शेवटची सवय म्हणजे सतत नकारात्मकतेने विचार करणे. जर तुम्ही सतत नकारात्मक देणे विचार करत राहायला. तुम्ही संपूर्ण निगेटिव्हिटीने भरलेले आहात. म्हणजे कोणत्याही गोष्टींमध्ये ती गोष्ट किती चांगली आहे हे सांगण्यापेक्षा ती गोष्ट किती वाईट आहे हेच सांगत राहिला. त्यामधली सकारात्मकता शोधत नसाल. तर अशा व्यक्तींपासून लोक दूर राहू लागतात. त्या व्यक्तींना कधीही लोक रिस्पेक्ट देत नाही. कारण ही व्यक्ती सतत निगेटिव्ह विचार करते असे म्हणून या व्यक्तीजवळ कोणच येत नाही आणि त्यांना कोणीही रिस्पेक्ट देत नाही. म्हणून सतत निगेटिव्ह विचार करणे सोडून द्यावे. तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील.

अशाप्रकारे जर आपण या सात सवयी सुधारला तर नक्कीच समाजामध्ये आपल्याला आदर मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *