फक्त कष्ट करून कोणीही श्रीमंत होत नाही…. त्यासाठी हे पाच नियम नेहमी लक्षात ठेवा…!!

मनोरंजन

मित्रांनो, प्रत्येक मनुष्याच्या अंगात अशी क्षमता असते की तो श्रीमंत होऊ शकतो. परंतु त्यासाठी या जीवनामध्ये वावरताना काही नियम लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. आजच्या या जगामध्ये खूप कमी लोकांकडे अमाप संपत्ती आहे आणि बाकीच्या लोकांच्या हातात खूप कष्ट असते. कष्ट करून देखील त्यांच्याकडे पैसा म्हणावा तितका नसतो. या श्रीमंत लोकांना काही नियम माहित असतात. दैनंदिन जीवनात ते नियम अमलात आणतात आणि याच कारणामुळे ते श्रीमंत होत आहेत. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण असे काही पाच नियम जाणून घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला देखील श्रीमंत होता येईल.

त्यातील पहिला नियम म्हणजे श्रीमंत लोकांना सगळीकडे भरभराट दिसते, गरीब लोकांना सगळीकडे कमतरता दिसते. श्रीमंत लोकांची मानसिकता भरभराटीची असते ते एका निसर्ग नियमाचे काटेकोर पणे पालन करतात तो म्हणजे “जसा विचार तसा जीवनाला आकार” त्यांना माहिती असते आपण ज्या प्रमाणे विचार करू त्या प्रमाणे आपल्याकडून कृती घडणार आहे. त्यांना माहिती असते कोणतेही गोष्ट २ वेळा निर्माण होते. एकदा मनामध्ये आणि नंतर प्रत्येक्षात. त्यामुळे ते अट्टहासाने भरभराटीचा विचार करतात.त्यांच्या मध्ये ह्या जगात सर्व काही भरपूर आहे. मग ते पैसा असेल, वेळ असेल संधी असतील त्यांना सगळीकडे फक्त भरभराट दिसते. मनामध्ये भरभराट असल्यामुळे प्रत्येक्षात त्यांच्या आयुष्यात सुद्धा भरभराट होते.

दुसरा नियम म्हणजे श्रीमंत लोकांना नेहमी संधी दिसते गरीब लोकांना नेहमी समस्या दिसतात. एक मोठी नामांकित बुटांची कंपनी असते. ह्या कंपनीला आफ्रिकेच्या एका मोठ्या शहरमध्ये आपली शाखा उघडायची असते. त्या कंपनीतला बॉस आपल्या २ कर्मचाऱ्यांना एक काम सांगतो. तुम्ही आफ्रिकेच्या ह्या शहरामध्ये जाऊन या आणि मला सांगा आपण जर त्या शहरात आपल्या कंपनीची शाखा उघडली तर आपल्याला फायदा होईल का ? दोघे कर्मचारी सांगितल्या प्रमाणे त्या आफ्रिकेच्या शहरा मध्ये जाऊन येतात. पहिला कर्मचारी आपल्या बॉस ला रिपोर्ट द्यायला येतो. बॉस त्याला विचारतो तुला काय वाटते, आपल्या बुटांना त्या शहरामध्ये काही स्कोप आहे का?

हे वाचा:   जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल त्यावेळी… हे नक्की वाचा?

तेव्हा पहिला कर्मचारी उत्तरतो, बॉस त्या शहरामध्ये कोणच बूट घालत नाही त्यामुळे आपण जर तिथे आपल्या कंपनीची शाखा उघडली तर आपले खूप मोठे नुकसान होईल बॉस सगळं नीट ऐकून घेतो आणि त्याला म्हणतो ठीक आहे, तुझ्या सहकार्याला पाठवून दे. आता दुसरा कर्मचारी येतो बॉस त्याला सुद्धा तोच प्रश्न विचारतो. तुला काय वाटते, आपल्या बुटांना त्या शहरामध्ये काही स्कोप आहे का ? तेव्हा तो दुसरा कर्मचारी उत्तरतो, बॉस त्या शहरामध्ये कोणच बूट घालत नाही त्यामुळं मला वाटते त्या शहरामध्ये आपल्याला खूप मोठा स्कोप आहे. आपण जर त्यांना बुटाचे महत्व पटवू शकलो तर आपल्या कंपनीचा खूप फायदा होऊ शकतो. इथे तुम्ही पाहिले तर दोन्ही कर्मचारी एकाच ठिकाणी जाऊन आले होते पण तिथे एकाला समस्या दिसली आणि दुसऱ्याला संधी.

तिसरा नियम म्हणजे श्रीमंत लोक झटपट यशाच्या मागे लागत नाही, गरीब लोकांना सर्वकाही झटपट पाहिजे असते. वॉरेन बफेक्ट म्हणतात “वास्तवता हि आहे कि, तुम्ही कितीही हुशार असाल किंवा मेहनती असाल काही गोष्टी आयुष्यात मिळायला वेळ लागतो, त्यामध्ये श्रीमंती सुद्धा येते”. श्रीमंत लोक कधीच झटपट पैसा किंवा झटपट यश अश्या गोष्टींच्या मागे लागत नाही त्यांच्यामध्ये संयम असतो. त्यामुळे ते जे काही करतात मग तो व्यवसाय असेल, पैस्यांची गुंतवणूक असेल किंवा ते करत असलेली मेहनत असेल त्यांना माहिती असते परिणाम यायला थोडा कालावधी लागेल त्यामुळे ते सातत्याने प्रयत्न करत राहतात त्यांचा शॉर्टकट वर विश्वास नसतो.

चौथा नियम म्हणजे श्रीमंत लोक आपल्या संगतीला खूप महत्व देतात, जिथे गरीब लोकांना संगतीचे महत्व माहिती नसते. असे म्हणतात तुमचे नेटवर्क तुमचा नेट वर्थ ठरवते. श्रीमंत लोक अट्टहासाने अश्या लोकांमध्ये राहायचा प्रयत्न करतात जे श्रीमंत तर असतातच शिवाय ज्यांच्याकडे एक व्हिजन असते ध्येय असतात. जे नेहमी उज्ज्वल भविष्याबद्दल बोलत असतात. ज्या वेळेस आपण अश्या ध्येय वेड्या लोकांनबरोबर राहायला सुरुवात करतो, आपला दृष्टिकोन बदलतो आपण सुद्धा आयुष्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित होतो. इथं संगत फक्त माणसांची म्हणत नाही संगत चांगल्या पुस्तकांची असू शकते, चांगल्या प्रेरणादायी व्हिडिओ ची असू शकते.

हे वाचा:   प्रेमात पडलेल्या महिलांच्या मनात काय सुरु असते ? पुरुषांनी एकदा नक्की बघा…!!

पाचवा नियम म्हणजे श्रीमंत लोक पैश्याला कामाला लावतात, गरीब लोक पैशांसाठी काम करतात. या जगात जास्त प्रमाणात लोक पैशांसाठी काम करतात, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यावर लहानपणी झालेले संस्कार आपल्याला हेच शिकवले जाते चांगले शिक्षण घ्यायचे एखादा चांगला जॉब करायचा.रिटायर होई पर्यंत पैशांची बचत करायची वगेरे वगैरे ह्या पद्धतीमध्ये काहीच चूक नाही पण ह्या मार्गाने तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही.

रिच डॅड पुअर डॅड चे लेखक रॉबबर्ट कियोसाकी म्हणतात, ह्या पद्धतीमध्ये समस्या हि आहे जो पर्यंत तुम्ही काम कराल, तो पर्यंतच तुम्हाला पैसे मिळत राहतील. तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला जास्त काम करावे लागेल त्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल जे शरीरासाठी चांगले नाही. जे श्रीमंत लोक पैश्याला कामाला लावतात ते आर्थिक शिक्षण घेतात गुंतवणुकीचे ज्ञान संपादन करतात आणि मग ते आपले पैसे अश्या ठिकाणी गुंतवतात जिथे त्यांना सातत्याने चांगला परतवा मिळत राहतो. थोडक्यात श्रीमंत लोक अससेट्स गोळा करतात आणि गरीब लोक लायबिलिटीज.

अशाप्रकारे हे काही पाच नियम आहेत ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *