कटू आहे पण सत्य आहे…मराठी सुविचार…. प्रत्येकवेळी जाऊदे म्हणून आपण समोरच्याचं बोलण मनावर घेत नाही पण ……!!

मनोरंजन

मित्रांनो, प्रत्येक वेळी जर आपल्याला कोणी काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून सतत टोमणे मारत असतात आणि आपण प्रत्येक वेळेस जाऊदे म्हणून सोडत असतो. परंतु समोरचा व्यक्ती त्याची सवय का सोडत नाही. तो आपल्याला कशाप्रकारे त्रास होईल याचा विचार करत असतो. हे कटू सत्य आहे. म्हणूनच आजच्या या लेखानातून आपण अशाच काही मराठी सुविचार माहिती काढून घेणार आहोत.

प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला जास्त किंमत देत नसतात..

समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो .

प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याच बोलणं मनावर घेत नाही. पण… समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल…. तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलंच पाहिजे….!

हे वाचा:   डोळ्यात पाणी आलं प्रा. नितीन बानुगडे पाटील व्याख्यान मनाला भिडणारा प्रसंग आई काय असते….!!

प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसाल तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार जो जसा वागतो त्याच्याशी तसंच वागायचं !

विश्वास असेल तर, न बोलताही सारं काही समजून घेता येतं… आणि विश्वासच नसेल तर, बोललेल्या प्रत्येक शब्दाचा ‘चुकीचा’ अर्थ घेतला जातो…

जे आपली ‘बदनामी’ करतात त्यांना करू द्या.. कारण की, बदनामी तेच लोकं करतात जे आपली बरोबरी करूच शकत नाही…!!

कोण” हसवून” गेल कोण”फसवून”गेल हे महत्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला नरकाच्या वर्गात बसवून गेल हे महत्वाचं…

माणुस तेव्हाच एकटा पडतो, जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरु करतो !

माणसाला परके कोण ? हे कळण्यापेक्षा आपले कोण ? हे कळायला जास्त वेळ लागतो !

जिवनात कोणताही खेळ खेळा पण कोणाच्याही आयुष्याशी, भविष्याशी आणि भावनांशी तर कधीच खेळू नका..

हे वाचा:   जेव्हा तुम्हाला जवळची व्यक्ती Ignore करते, तेव्हा फक्त हे करा…!!

मानवी नातं जपण्यासाठी मी पणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढतो.

अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.

अशाप्रकारे हे काही सुविचार आहेत. ज्यातून आपल्याला आपला जीवनात वावरताना लोकांचे वागणे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *