विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते?… परपुरुषाकडे आकर्षित का होते? प्रत्येक विवाहित जोडप्याने वाचावा असा सुंदर लेख..!!

ट्रेंडिंग

मित्रांनो आज काल अनेक स्त्री परपुरुषाच्या मागे लागताना आपण पाहत आहोत. स्त्री विवाहित असताना देखील परपुरुषाकडे आकर्षित होते. याचे समाजामध्ये प्रमाण जास्त प्रमाणा त वाढलेले दिसून येत आहे. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते?… परपुरुषाकडे आकर्षित का होते?…. याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

समाजातील वास्तव मांडणारा विषय. समाजातील आदर्श संसार टिकवण्यासाठी आणि एका स्त्रीचा हक्क तिला मिळण्यासाठी हा विषय घेतला बहुसंख्य स्त्रिया पतिव्रता आहेत. आपली संस्कृती सुद्धा तशी आहे. अनेकवेळा चांगल्या स्त्रियांचा सुद्धा त्यांच्या स्वतःच्याही न कळत पाय घसरतो. त्यांच्या मनात नसतांनाही त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात. प्रश्न मोठा आहे आणि आजच्या समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे.

स्त्री ही फिजिकल रिलेशन साठी परपुरुषाकडे आकर्षित होते. स्त्री फिजिकल रिलेशन साठीच परपुरुषाशी मैत्री करते असेच अनेकांना वाटते. इंटरनेट वरील अनेक व्हिडिओ, कथा यामधून सुद्धा असेच चित्र उभे केले जाते. याच विषयावरील TV मालिका सुद्धा हेच प्रसंग दाखवता. स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून अनेक भावनिक गोष्ट हव्या असतात. तिची इच्छा नसतांनाही तिच्या मनाविरुद्ध तिची कृती घडते.

विवाहित स्त्रीला नवऱ्याकडून काय काय हवं असतं याचा सखोल विचार कधी केला का? स्त्री अथवा पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे ती रोबोट नाही. पत्नीला आपल्या नवऱ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हवा असतो हक्काचा माणूस आपला भावनिक माणूस! नवऱ्यामध्ये तिला असा माणूस हवा असतो की ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून तिच्या सर्व सुखदुःखाच्या भावना व्यक्त करू शकेल. ते सुद्धा अगदी मनमोकळेपणाने मैत्रीच्या नात्यासारख्या……

हे वाचा:   हे पाच संकेत दिसले तर समजून जा कुणीतरी तुमची खुप आठवण काढत आहे…..!!

वैयक्तिक जीवनातील आनंद, हर्ष आणि दुःख हक्काने आणि निःसंकोचपणे निडरपणे व्यक्त करता येईल एवढा हक्काचा आणि विश्वासाचं माणूस तिला आपल्या नवऱ्यात हवा असतो ती त्याच्याजवळ असताना जगातील सर्वोच्च समाधान आणि सुरक्षितता तिला प्राप्त व्हावी. तिने त्याच्या सहवासात जगातील सर्वोच्च व्यक्ती अनुभवायला हवा, तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा सखा हवा असतो. नवरा बायकोमध्ये या भावनिक नात्याची कमतरता भासते, तेव्हा तिचा न कळत हे सर्व पुरवणाऱ्या व्यक्तीकडे मन झुकायला लागते.

अशा व्यक्तीचा सहवास तिला सुरक्षित वाटायला लागते.जगातील प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीशी हक्काच्या माणसाचे, मैत्रीचे नातेसंबंध प्रस्थापित करावे.स्त्री नवऱ्याच्या रिमोट कंट्रोल वर चालणार रोबोट नाही. तिला मन, भावना, आहेत. तिच्या मनाचा भावनेचा आदर करून तिच्याशी नाते असावे. अनेक वेळा पत्नीला गृहीत धरले जाते. नवऱ्यापेक्षा कमी शिकलेली असल्यास बरेचदा तिच्या मतालाही किंमत दिल्या जात नाही. ती एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे. तिला सुद्धा भावना, विचार, मन आहे याचा विचार होत नाही.

तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी तिला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने ती अस्वस्थ होते, बेचैन होते. श्वास कोंडल्यासारखा होतो.ती भावना मोकळ्या करण्यासाठी तळमळते याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास आणि नेमकं याच वेळेत तिला इतर कुणाची भावनिक साथ मिळाली की नैसर्गिकच तीं त्या व्यक्तीकडे आकर्षित होते. तिची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषाने समजून न घेतल्याने तिला आपली किंमतच शून्य आहे असे वाटायला लागते.

तिच्या असण्याने आणि नसल्याने कुणाला काही फरक पडत नाही असे जेव्हा तिला वाटायला लागते तेव्हा ती स्वतःच महत्व हरवून बसते.नवरा आपली एवढी काळजी करत नाही किंमत देत नाही परंतु तिहाईत व्यक्तीला आपलं महत्त्व आहे असे तिला वाटायला लागते. आणि मग तिकडे ती भावनिक झुकल्या जाते. जेव्हा स्त्री कुटुंबात असते तेव्हा तिला तिचा योग्य दर्जा न मिळाल्याने ती उद्विग्न होऊ शकते. अनेकवेळा कुटुंबातून छळ, कपट, कास्थान यामुळे कौटुंबिक प्रेम कमी होणे.हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते कारण स्वतःचा नवरा आणि कुटुंबीय ऐकत नसल्याने भावना व्यक्त करण्यासाठी भावनिक आधारासाठी कुणीतरी शोधल्या जाते.

हे वाचा:   फक्त २ रुपयांत या पांढऱ्या वस्तूने मोगरा फुलांनी भर भरून जाईल… मोगरा रोपासाठी खास टिप्स?

भावना जुळल्या गेल्या तरच फिजिकल रिलेशन कडे आवडीने वळल्या जाते.तिच्या अस्तित्त्वाचा, आपलेपणाचा कर्तव्याचा आणि जिव्हाळ्याचा विचार व्हावा.स्त्री खूप कणखर अस्ते ती सहसा आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडूच देत नाही.पण तिचा कधीच विचार होत नसेल तर मात्र ती एकदा चुकली की समाज आणि इतरांचा विचार् करत नाही. तिच्या सहनशीलतेचा अंत न पाहता. भावनेचा विचार व्हावा. तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे. हल्लीच्या स्त्रीला तिच्या आयुष्याचा अर्थ कळला तिला तिच्या भावना दडपून जगायचं नाही.चुकीच्या पावलाआधी 100 वेळा विचार करते.नवऱ्याने वेळीच सावध व्हावें.

अशा प्रकारे या लेखाना मध्ये आपण विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते? परपुरुषाकडे आकर्षित का होते? याची माहिती जाणून घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *