कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशीबवान, आणि भाग्यवान असतात? या दिवशी ह्या झालेली मुलं लाखात एक असतात…!!

अध्यात्म

मित्रांनो, एखादे मूल जन्माला आले की त्याच्या जन्मलेल्या वारा वरून, तारखे वरून, तीथी वरून ज्योतिष शास्त्रामध्ये त्याचे भविष्य सांगितले जाते. त्याचा स्वभाव कसा असेल? याचा अंदाज बांधला जातो. तो पुढे काय काय करू शकतो? याबद्दलही थोडा प्रमाणात सांगितले जातात. प्रत्येक वारा मागे देखील त्या व्यक्तीचे भविष्य दडलेले असते. आज आपण अशा व्यक्तींची माहिती पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मले म्हणून नशीबवान व भाग्यवान असतात? ते आपण जाणून घेऊया.

रविवार, ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते. त्या नशीबवान असतात. भाग्यवान असतात. आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. ह्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो. आणि ह्या व्यक्ती कोणाचाही कामात नाक खुपसत नाहीत. आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेले आवडत नाही. ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो.

सोमवारी, ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो.. त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात. सतत हसमुख असतात. सतत खुश राहतात. कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही. परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो. आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात. ह्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. मात्र योग्य तो निर्णय ह्यांना घेता येत नाही. या व्यक्ती आपल्या आई वरती खूप प्रेम करतात.

हे वाचा:   पिंपळाचे झाड तो’डल्यावर काय होते? घराच्या आसपास पिंपळाचे झाड असल्याने काय परिणाम होतात..यावर उपाय काय..जाणून घ्या !

मंगळवार, ज्यांचा जन्म मंगळवारी होतो. त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते. हे स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र ते खूप हट्टी असतात. एखादी गोष्ट त्यांना आवडली कि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात. ह्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इनामदार असतात. दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात. ह्यांना ऐष,आरामाचे जीवन जगणे पसंत असते. कोणत्याही चूकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत. दुसऱ्या वरती सातत्याने इमानदारी बाळगतात.

बुधवार, ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात. त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते. त्या नशीबवान असतात..भाग्यवान असतात. हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात. हे लोक देवा धर्माची कामे जास्त करतात.

गुरुवार, ज्यांचा जन्म गुरवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे कि त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्यावर मात कशी करायची, दुसऱ्या वरती छाप कशी सोडावी हे त्यांना खूप चांगले जमते. ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात. ह्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात.

हे वाचा:   मृत्यु नंतर आत्मा 24 तासात घरी परत का येतो ? किती दिवस घरी राहतो आत्मा एकदा नक्की बघा ….!!

शुक्रवार, ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात. तुम्ही त्यांना कितीही पीडा, त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात. कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावुक असतात. भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते. त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा. ते त्याला कधीच सिरीयस घेणार नाहीत. अत्यंत जिन्दादील व्यक्ती असतात. ह्या विचारांनी खूप स्थिर असतात. म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही.

शनिवारी, ज्यांचा जन्म ह्या दिवशी होतो, त्यांच्यावर शनी देवांची कृपा असते. त्यांच्यावर शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. ह्या व्यक्ती अगदी मनमौजेपणे जगतात. एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत. दुसऱ्याची मन जिंकून घेणारी असतात. सतत हसमुख रहातात, आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्या मध्ये असते. जिथे जातात तिथल्याच होऊन जातात. म्हणून लोक त्यांच्यवरती प्रेम करतात.

अशा प्रकारे आपण आज पाहिले की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवंत असतात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *