मित्रांनो, विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात, किंवा आपल्या शरीरामध्ये मुंग्या आल्या सारख्या वाटत असतील तर आज आपण या लेखामध्ये आपणास विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरविण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. परंतु मित्रांनो शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो. विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते. परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.
परंतु मित्रांनो जर एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तुम्ही जाता आणि अडचणीच्या ठिकाणी हात घालता आणि मग अचानक खूप वेदांनांनी हात मागे घेता. वेदना इतक्या भयानक असतात की आपल्याला लगेच कळते आपल्याला विंचू चावला आहे. अर्थात जर तुम्ही डॉक्टरांकडे पोहचू शकत असाल तर पहिल्यांदा ते करावे. केवळ घरगुती उपायावर अवलंबून राहू नये. प्रथमोपचार म्हणून तुम्ही याचा नक्की उपयोग करू शकता.
आणि विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसून येतात. पण मित्रांनो अशा वेळी घाबरून न जाता आपण त्यावर काही घरगुती उपाय केले तर यामुळे विंचू चे विष आपल्या शरीरामध्ये पसरत नाही. ते लगेच उतरते. विंचू चावला मुळे ज्या वेदना होतात त्या वेदना देखील कमी होतात. तसेच तुम्हाला लगेच आराम देखील पडतो आणि मित्रांनो, विंचू चे विष उतरवण्यासाठी पहिला पदार्थ जो आहेत तो म्हणजे चिंचुके. चिंचूके यांचा जो वरचा भाग असतो, त्याचे सालपट असते ते आपल्याला काढून टाकायचे आहे.
आणि हा भाग सहजासहजी निघून जात नाही तो आपल्याला दगडावर घासून/ उगाळून काढावा लागतो. अशाप्रकारे तो भाग काढून टाकल्यानंतर तो आतील पांढरा भाग असतो तो भाग ज्या ठिकाणी विंचू चावला असेल, त्या ठिकाणी लावावा व जोपर्यंत वेदना कमी होत नाही तोपर्यंत तो तिथेच राहू द्यावा.मित्रांनो, विंचू चावल्यास त्यावेळी आपल्याकडे चिंचुके उपलब्ध नसतील तर, आपल्याला तुरटीचा देखील वापर करता येतो. विंचवाचे विष उतरविण्या साठी दुसरा उपाय जो आहे दुसरा पदार्थ जो आहे तो म्हणजे तुरटी. तुरटीचा उपाय करत असताना तुरटी गरम करायला म्हणजे ती वितळून घ्यायचे असते. त्यासाठी थोडी तुरटी घेऊन ती गॅसवर वितळण्यासाठी ठेवावी.
तुरटी वितळला नंतर ज्या ठिकाणी आपला हा विंचू चावला आहे त्या ठिकाणी ही तुरटी धरून ठेवायची आहे. ती तुरटी त्या भागाला चिटकून बसेल जोपर्यंत विंचू चे विष उतरत नाही किंवा निघून जात नाही तोपर्यंत ही तुरटी त्या जागेवरून निघत नाही. विंचूचे विष उतरविण्यासाठी तिसरा व महत्त्वाचा उपाय आहे जो आहे तो म्हणजे कैरी किंवा आंबा.विंचू चावल्यानंतर तुमच्या अवतीभवती आंबे किंवा कैरी असेल ती आणून, त्याचा चीक असतो तो चिक आपल्याला ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी लावावा. त्यामुळे विंचवाचे विष उतरेल.
मित्रांनो, अशाप्रकारे विंचू चे विष उतरविण्यासाठी आपण तीन उपाय बघितले आहे. हे तिन्ही उपाय अत्यंत गुणकारी असल्याने विष उतरेल व त्याच बरोबर त्यामुळे होणाऱ्या वेताना देखील कमी होते. तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.