तुमचा अपमान होत असेल लोक किंमत देत नसतील, तर फक्त या सहा गोष्टी करा, पूर्ण जग तुमचा रिस्पेक्ट करेल…..!!

मनोरंजन

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की आज काल लोक एकमेकांना रिस्पेक्ट देत नाही आहेत. आजच्या या जगामध्ये जर आपण कोणाला रिस्पेक्ट दिली तरच ती समोरची व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देते. परंतु काही वेळेला जर आपण समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट देऊन देखील तो व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देत नसेल तर अशावेळी काय करावे? यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण सहा गोष्टी जाणून घेणार आहोत. जर या सहा गोष्टी आपण केल्या तर आपल्याला समाजामध्ये रिस्पेक्ट मिळेल. कारण रिस्पेक्टही मागून मिळत नसते तर ती कमवावी लागते.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जे काही बोलाल ते तुमच्या कृतीने सिद्ध करा. म्हणजेच इतर व्यक्ती सोबत आपण जे काही गोष्ट बोलत आहोत. जे काही आपण सांगत आहोत. की मी हे करीन, मी ते करीन, मी हे करतोय, मी ते करतो. ते आपल्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करा. तरच लोक तुम्हाला समाजामध्ये रिस्पेक्ट देऊ लागतील नाहीतर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. कारण लोक बढाया मारणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष देत नाहीत. ज्यांची बढाई कृतीमध्ये दिसते त्याच लोकांना लोक जास्त रिस्पेक्ट देत असतात.

दुसरी गोष्ट म्हणजे जिथे गरज नाही तिथे माफी मागू नका. काही लोक गरज नसताना, आपली चूक नसताना देखील इतरांना खुश ठेवण्यासाठी माफी मागत असतात. अशी लोक हे सतत स्वतःसाठी न जगता इतरांसाठी इतरांचा विचार करून जगत असतात. त्यामुळे लोक त्यांना रिस्पेक्ट देत नाही. याच कारणामुळे त्यांची समाजा मध्ये किंमत कमी होते. म्हणून गरज नसताना माफी मागू नये. काहीही झाले तरी या तीन गोष्टीसाठी तुम्ही माफी मागू नका. 1. जिथे तुमची काहीही चूक नाही. 2.जिथे तुमचा काहीच कंट्रोल नाही. 3.ज्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. ज्याला तुम्ही बदलू शकत नाही. ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे वाटता.

हे वाचा:   पुरुषांसाठी आवश्यक नियम…. प्रत्येक माणसांमध्ये हे गुण असायलाच हवेत….चांगले संस्कार?

तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सर्वात अधिक प्रायोरिटी द्या. इतरांना वेळ देणारी स्वतः साठी वेळ द्या. कारण ही व्यक्ती सर्वात आधी स्वतःचा विचार करते मग इतरांचा विचार करते. असेच व्यक्ती भविष्यामध्ये मोठ्या मार्गावर असते आणि अशा लोकांना लोक जास्त डिमांड करतात. अर्थशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की जर एखाद्या व्यक्तीने इतरांसाठी उपलब्ध राहणे कमी केले तर लोकांना त्या व्यक्तीची खूप डिमांड होऊ लागते. आणि आपोआपच लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतात. म्हणून कधीही इतरांना वेळ देण्याआधी स्वतःचा विचार करावा.

चौथी गोष्ट म्हणजे प्रश्न विचारा आणि समोरच्याचे मन लावून ऐका. आपण अनेक वेळा अशी व्यक्ती पाहिलेले आहोत की आपण जर एखाद्या व्यक्तीला काही सांगायला गेले तर तो आपल्याला कमी देखते व तो आपले बोलणे ऐकून घेण्याआधीच हो हो मला हे माहित आहे! असं म्हणून तो स्वतःच्या बढाया मारू लागतो. असे केल्याने त्या व्यक्तीची समाजामध्ये रिस्पेक्ट राहत नाही. म्हणून कधीही जरी आपल्याला कोणत्या विषयाचे ज्ञान भरपूर असले तरीही समोरच्या व्यक्तीला आपण काही प्रश्न विचारावे व त्याचे म्हणणे मन लावून ऐकून घ्यावे. असे केल्याने आपल्या ज्ञानामध्ये भर देखील पडते व आपला रिस्पेक्ट वाढतो.

हे वाचा:   हे ८ विचार – जे कटू आहेत पण सत्य आहेत? १) तुमचे सिक्रेट बायकोलाही सांगू नका, हृदयाला भिडणारे चांगले सुविचार ……!!!!!

पाचवी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही लोकांना आवडाल अशा अपेक्षा ठेवू नका. जे योग्य आहे तेच करा. काही लोकांचा गैरसमज असतो. की जर आपण लोकांचे चहाते झालो तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील. पण हे समज चुकीची आहे. कारण जर आपण लोकांना आवडायला पाहिजे असे म्हणून चुकीचा निर्णय घेऊ लागलो तर लोक आपल्याला कधीही रिस्पेक्ट देणार नाही. परंतु काही वेळेला जर लोक आपल्या विरुद्ध असतील आणि आपण योग्य त्या निर्णयाची साथ दिली तर नक्कीच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील.

सहावी गोष्ट म्हणजे आपला स्वाभिमान जपा. स्वतःचे हक्क जाणून घ्या. जर आपण स्वतःची रिस्पेक्ट केली स्वतःचा स्वाभिमान जपला तरच लोक आपल्याला रिस्पेक्ट देतील. कारण लोक अशाच व्यक्तींना रिस्पेक्ट देत असतात जे लोक रिस्पेक्ट देण्यासाठी पात्र आहे आणि रिस्पेक्ट देणे पात्र असणारी व्यक्ती तीच असते ती स्वतः ला सर्वात आधी रिस्पेक्ट देते व स्वतःचा स्वाभिमान जपत असते. म्हणून कधी पण स्वतःचा स्वाभिमान जपायला शिका आणि स्वतःचे हक्क जाणून घ्या.

अशाप्रकारे या सहा गोष्टी आहेत. ज्या गोष्टी जर आपण केला तर नक्कीच लोक आपल्याला रिस्पेक्ट देऊ लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *