मित्रांनो, पूर्वीचे लोक म्हणायची घरात नवीन स्त्री आली तर ती घराचा वृंदावन करू शकते नाहीतर स्मशान करू शकते. कारण तिचा हातात असते ह्या घराला कसे सांभाळायचे आणि कसे पुढे घेऊन चालायचे. त्यासाठी घरातील स्त्रीच्या मध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे? याचीच माहिती आजच्या या लेखनामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
1. जर तुम्हाला तुमच्या पतीबरोबर खुश राहायचंय ना, तर इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा.
2. तुमच्या स्वतःला तुमच्या पतीची गर्लफ्रेंड समजू नका. बायकोचं समजा. आपण आपल्या पतीबरोबर गर्लफ्रेंड प्रमाणे treat करायला लागतो. पण यामुळे कुठेतरी आपण आपली value कमी करून घेतो. याचा सरळ-सरळं अर्थ असा होतो, की आपण स्वतःला कमी समजतोय. लक्षात घ्या, बायको बायको असते. आणि बायकोचं स्थान हे गर्लफ्रेंड पेक्षा खूप जास्त मोठं असतं. एक असं स्थान असतं जे कुणीही हिसकावून घेऊ शकतं नाही.
3. जर तुम्हाला तुमच्या वैवाहिकजीवनामध्ये खुश रहायचंय ना तर तुमच्या पतीची तुलना अजून दुसऱ्या कोणत्याही पुरुषाबरोबर करू नका. जर तुम्हाला हवं असेल, की तुमच्या दोघांच नातं नेहमी असचं रहावं. तर तुमच्या पतीला अजिबात कुणाबरोबर compare करू नका. तो जसा आहे तसा best आहे. त्याचा तसाचं स्वीकार करा. त्याला समजून घ्या.
4. जेव्हा केव्हा तुमचा पती बाहेरून थकून घरी येईल, तेव्हा त्याच्याशी चांगलं बोला. भलेही तुम्हाला दिवासभारचं काहीतरी tension असेल, तुमच्या बरोबर काहीतरी झालं असेल, तुमची चिडचिड होतं असेल. तरीही तुमच्या पतीबरोबर काही वेळ गोड बोला. छान बोला. तुमचा दिवस कसा गेला असं त्याला विचारा. लगेचंच तुमचं सुरू करू नका. कारण तोही बाहेरून थकून आलेला असतो. आणि तुमचा बोलला गेलेला एक गोडाचा शब्द त्याची पूर्ण थकावट दूर करून टाकतो.
5. जर तुमचा पती तुम्हाला प्रेम दाखवतं नसेल, तर हा गैरसमज करून घेऊ नका; की त्याचं तुमच्यावर प्रेमचं नाही आहे.बघा प्रत्येक माणसाची प्रेम करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. याचीही काहीतरी वेगळी असेल. कदाचित तो तुम्हाला दाखवत नसेल, पण तो तुमच्यावर खूप प्रेम करतं असतो.
6. जेव्हा केव्हा तुमच्या दोघांमध्ये भांडणी होतील, तेव्हा तुमच्या नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी तुम्हीच चिडचीड करू नका.कारण बायकांना सवय असते, बऱ्याचदा बायकाचं चिडचिड करता. संताप करतात, ओरडतात, आणि पती ऐकून घेतात. पण कधी कधी तुम्ही सुद्धा शांत रहा. कधी कधी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. कधी कधी त्यांचा संताप सहन करून घ्या. कधी कधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.
7. तुमच्या पतीची आर्थिक परिस्थिति समजून घ्या. त्याच्याकडे किती पैसे आहेत, तो किती कमावतोय. या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधूनचं त्याच्याकडून काही मागायचं ते मागा. काहीही जास्त मागू नका. जास्त खर्च करू नका. काटकसर करायला शिका. जिथे खरचं गरजं असेल तिथेचं खर्च करा.
8. आपल्याला नेहमी हवं असतं, की आपल्या पतीने आपला नेहमी आदर केला पाहिजे. आपली respect केली पाहिजे, आणि तो करतो सुद्धा. अगदी त्याचप्रमाणे आपलं सुद्धा कर्तव्य आहे; की आपणही आपल्या पतीची respect केली पाहिजे.
9. बघा तो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत आपल्यासाठी कामं करतं असतो. आपल्या मुलांसाठी झटतं असतो. म्हणून तुमचीही जबाबदारी आहे तुमच्या पतीचा आदर करण्याची. त्याचा सन्मान करण्याची.
10. आधी समजून घ्या, पूर्ण कारण माहिती करून घ्या. आणि मगचं भांडण करा. विनाकारण भांडू नका.
11. तुमच्या सासरी घडलेल्या गोष्टी माहेरी करू नका, आणि माहेरी झालेल्या काही गोष्टी सासरी सांगू नका. ही maturity असते माहितीये. उगाचं ईकडच्या गोष्टी तिकडे सांगून बऱ्याचदा गैरसमज होतात. म्हणून या गोष्टींची जरा काळजी घ्या.
12. तुमच्या पतीबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करा. त्याला सगळ्या गोष्टी सांगा, आणि त्याचप्रमाणे त्याच्या सोबतं काय झालं, त्याच्या बरोबर रोज काय काय घडतं, त्याला कामात किती तणाव आहे, त्याला काय tension आहे. हे सुद्धा ऐकून घ्या. जसं तुम्ही तुमचं सांगाल तसं त्यांचंही ऐकून घ्या.
13. एकमेकांना समजून घ्या.
14. तुमचं नातं अजून घट्ट बनवा.
15. एकमेकांची साथ द्या.
अशाप्रकारे हे काही गुण आहेत जे प्रत्येक स्त्रीमध्ये असणे खूप गरजेचे आहे.