कितीही खराब झालेली गॅसची शेगडी साफ करा मोजून फक्त दोन मिनिटांत चकाचक चमकवा या घरगुती उपायाने …..!!

ट्रेंडिंग

मित्रांनो प्रत्येकांच्याच घरामध्ये घरातील स्त्रिया गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक तयार करत असतात. आणि हा स्वयंपाक तयार करत असताना कोणत्या ना कोणत्या कारणावरून कोणतेही पदार्थ सांडतात. आणि हे सांडलेल्या पदार्थांचे डाग चिवट होतात हे दाग पुसून देखील जात नाही. असा अनुभव प्रत्येक घरातील स्त्रियांना येतच असतो. रोजच्या रोज स्वयंपाक झाल्यानंतर आपण गॅसची शिडी स्वच्छ करून घेतो. मात्र काही डाग तसेच राहतात. अशा प्रकारचे गॅसच्या शेगडीवर पडलेले डाग गॅसच्या बटनामध्ये किंवा कोपऱ्यामध्ये तसेच राहतात. चिवट प्रकारचे पडलेले गॅस शेगडी वरील डाग कशा पद्धतीने स्वच्छ करणार आहोत. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.

गॅसच्या शेगडीवर पडलेले चिवट डाग साफ करत असताना सर्वप्रथम गॅस बंद करून घ्यायचा आहे. सिलेंडरचे बटन देखील बंद करायचे आहे. तसेच गॅसच्या शेगडीवर जे आपले बर्नर आहेत. ते बर्नर देखील आपल्याला बाजूला काढायचे आहेत. बर्नल बाजूला काढून झाल्यानंतर एका वाटीमध्ये कोमट पाणी घ्यायचे आहे. आणि त्या कोमट पाण्यामध्ये आणि त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला धुण्याचा सोडा एक चमचा घालायचा आहे. कोमट पाणी घेतल्याने जी चिवट डाग आहेत. ते सहज निघतात कोमट पाणी धुण्याचा सोडा व त्यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा देखील घालायचा आहे. हे मिश्रण एकजीव करून गॅसच्या शेगडीवर सर्वत्र टाकायचे आहे. गॅसची शेगडी स्वच्छ करत असताना जे गॅसचे स्टॅन्ड आहे.

ते काढायचे नाहीत ते देखील स्वच्छ करून घ्यायचे आहेत. जे मिश्रण आपण तयार करून घेतलेले आहेत. ते गॅसच्या शेगडीवर सर्वत्र पसरून घेणार आहे. त्याचबरोबर गॅसची जी बटन आहे. त्या बटणावर देखील आपण हे मिश्रण ओतणार आहोत. यामुळे जी चिवट डाग आहेत ते सर्व डाग स्वच्छ होणार आहेत. आणि हे मिश्रण आपल्याला कमीत कमी अर्धा तास ते वीस मिनिटे तसेच ठेवून द्यायचे आहे. तुमच्याजवळ जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही दहा मिनिटे देखील तसेच ठेवू शकता. पुन्हा एका वाटीमध्ये कोमट पाणी घ्यायचे आहे. आणि त्या कोमट पाण्यामध्ये धुण्याचा सोडा घालायचा आहे. जर तुम्ही यासाठी भांडी घासण्याचा साबण वापरला तरी चालतो. तारेचा चोता घेऊन त्या चोत्याच्या सहाय्याने गॅसची शेगडी घासून घ्यायची आहे.

हे वाचा:   अद्रक मध्ये मिक्स करा ही एक वस्तू आणि काळीकुट्ट झालेली कढई मोजून फक्त एका मिनिटांत चमकवा …!!

सर्वप्रथम आपण गॅसची प्लेट स्वच्छ तारेच्या चोथ्याने करून घेणार आहोत. वरील लेखांमध्ये सांगितलेले जे मिश्रण आहे. ते मिश्रण गॅसच्या शेगडीवर 20 ते 30 मिनिटांसाठी ठेवल्यामुळे गॅसच्या शेगडीवर जे चिवट डाग पडलेले आहेत. ते फुगलेले आहेत. ते डाग फुगलेले असल्यामुळे आपल्याला स्वच्छ करणे सोपे जाते. गॅसच्या प्लेटा धुवून झाल्यानंतर साफ करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची शेगडी देखील त्या चोथ्याच्या साह्याने स्वच्छ घासून घ्यायची आहे. आणि कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये जे चिवट डाग साठलेले आहेत. ते टोकदार वस्तूने स्वच्छ करून घ्यायचे आहेत. मग तुम्ही यासाठी चाकू किंवा चमचा वापरू शकता.

त्यानंतर आपण गॅसची बटन स्वच्छ करणार आहोत. त्यासाठी गॅसची बटणे बाजूला काढावीत. ही बटणे सहजच बाजूला निघतात. आणि सहजपणे आपल्याला पुन्हा गॅसला लावता येतात. ती बटणे बाजूला काढून झाल्यानंतर जे पाणी आपण गॅस स्वच्छ करण्यासाठी वापरलेले आहे. त्या पाण्यामध्ये ते बटन थोड्यावेळासाठी ठेवायचे आहे. त्यानंतर आपण गॅसच्या बटना खाली चिवट डाग तयार झालेले आहेत. ते चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जर आपण गॅसची शेगडी महिन्यातून एकदा साफ केली तर आपले स्वयंपाक घर स्वच्छ दिसेल आणि आपल्या गॅसच्या शेगडीवर अशी काळे डाग आपल्याला दिसणार नाहीत.

हे वाचा:   घरामधील, किचनमधील, झुरळंलांना कंटाळला आहात फक्त एक वेळेस हा उपाय करून पहा परत घरामध्ये नावालाही झुरळ दिसले तर बोला !

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरातील स्त्रियांना गॅसची शेगडी साफ करण्याचा कंटाळा देखील येणार नाही. गॅसची शेगडी स्वच्छ साफ करून झाल्यानंतर गॅसच्या प्लेटा व स्टॅन्ड देखील स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि ते स्वच्छ कापडाने पुसून घेऊन गॅसवर लावायचे आहेत. कारण जर ओलसर आपण तसेच गॅसच्या शेगडीवर ठेवले तर त्याला गंज लागण्याची शक्यता आहे. गंज लागू नये म्हणून आपल्याला गॅसची शेगडी व प्लेटा स्वच्छ पुसून गॅसवर ठेवायची आहे. त्यासोबतच आपण स्वच्छ करण्यासाठी जे गॅसचे बटन बाजूला काढून ठेवलेले आहे. ते बटन देखील स्वच्छ करून झाल्यानंतर पुसून कोरडे करूनच गॅसच्या शेगडीला लावायचे आहे.

यामुळे गॅसचे बटन बंद चालू करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. गॅसची बटन सहजच आपल्याला बंद चालू करता येतील. अशा प्रकारे जर आपण महिन्यातून एकदा गॅस शेगडी स्वच्छ केली तर आपल्या गॅसच्या शेगडीवर कोणत्याही प्रकारचे काळे व चिवट डाग बसणार नाहीत. तसेच आपली नवीन आणल्यासारखी चमकत राहील. अशा पद्धतीने जर आपण गॅसची शेगडी स्वच्छ केली तर आपले स्वयंपाक घर देखील खूप छान दिसेल कारण गॅसच्या शेगडी वर पडलेले काळे डाग दिसायला देखील खूप वाईट दिसतात. कितीही स्वच्छ केले तरी पुसून हे डाग स्वच्छ होत नाहीत. अशा पद्धतीने जर आपण गॅसची शेगडी स्वच्छ केली तर आपली गॅसची शेगडी नवीन आणल्यासारखी दिसेल …!!

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *