माणसाचे कर्म फिरून परत कसे येते एकदा सर्वांनी बघा? मराठी कथा… ..!!!

मनोरंजन

मित्रांनो, आपण जीवनामध्ये कोणकोणते कर्म करतो त्यावर भविष्यामध्ये येणारे फळ हे आपल्यावर अवलंबून असते. माणसांचे कर्म हे त्याच्या पुढील जीवनात येणारे फळ असते. म्हणून नेहमी सत्कर्म करत राहणे खूप गरजेचे आहे. माणसाने केलेले कर्म फिरून त्याच्याकडे कसे परत येते? याबद्दलची माहिती एका कथेच्या स्वरूपात आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

एक भिकारी होता. तो दारोदारी जाऊन भीक मागायचा. कुणी काही दिले तर, तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचा. एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा, पण सावकार मात्र जाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा,” जा मर. तू काम का करत नाहीस ? आयुष्यभर फक्त भीक मागत रहा.” कधी कधी तो रागाच्या भरात त्याला शिवीगाळ करायचा. सावकार भिकाऱ्याला म्हणायचा,” जा मर. तू काम का करत नाहीस ? आयुष्यभर फक्त भीक मागत रहा.” कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा.

पण भिकारी फक्त म्हणायचा,” देव तुमच्या पापांना क्षमा करो.” एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला. बहुदा धंद्यात तोटा झाला असावा. तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आला, सावकाराने रागात थेट त्याच्यावर दगड मारला. भिकाऱ्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, तरीही तो ” देव तुझी पापे क्षमा करो.” असे म्हणत तिथून निघून गेला. सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की, मी त्याला दगड मारला, पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली. यामागचं रहस्य काय असू शकेल. हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला. भिकारी कुठेही गेला, तरी सावकार त्याच्या मागे जायचा.

त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कुणीतरी त्याला मारले, अपमानित केले, शिवीगाळ केली, पण भिकारी एवढेच म्हणायचा, ” देव तुमची पापे क्षमा करो .”: आता अंधार पडू लागला होता. तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला. सावकार सुद्धा त्याच्या मागे होता. तो भिकारी आपल्या घरी परतला. एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती. जी त्या भिकाऱ्याची बायको होती, तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली. भीकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकरी होती, ती पाहताच म्हातारी म्हणाली,” एवढेच आज मिळाले का? आणि तुमचे डोके कसे फुटले.” तेव्हा भिकारी म्हणाला,” हो एवढंच. कुणी काही दिलं नाही. सगळ्यांनी शिव्या दिल्या, एकाने दगडफेक केली. त्यामुळे माझं डोकं फुटलं.”

हे वाचा:   प्रेमात पडलेल्या महिलांच्या मनात काय सुरु असते ? पुरुषांनी एकदा नक्की बघा…!!

तो भिकारी पुन्हा म्हणाला,” हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे. आठवत नाही का ?” ” आपण किती श्रीमंत होतो काही वर्षांपूर्वी. आपल्याकडे काय नव्हतं ? आपल्याकडे सर्व होतं. पण आपण कधीच दान केले नाही. तो आंधळा भिकारी आठवला का ?” म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली,” हो.” ” आपण त्या आंधळया भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो, भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो, त्याचा अपमान कसा करायचो, त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो. ” म्हातारी म्हणाली. तेव्हा म्हातारा म्हणाला,” हो, मला आठवते सगळं. सगळं किती छान होत आपलं. त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला, तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा, तेव्हा फक्त त्याला शिव्या दिल्या.

एकदा त्याला वाटी फेकून मारली, तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा.” देव तुझ्या पापांचा हिशोब घेईन, मी नाही. आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत. आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे. म्हणून मी कुणाला शाप देत नाही. आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. माझ्यावर कोणताही त्रास झाला, तरी माझ्या ओठांवर नेहमी आशीर्वाद असतो. कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणाला द्यायचे नाहीत. म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यांसाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो. कारण त्यांना माहित नाही की, ते कोणते पाप करत आहेत.

हे वाचा:   कटू आहे पण सत्य आहे…मराठी सुविचार…. प्रत्येकवेळी जाऊदे म्हणून आपण समोरच्याचं बोलण मनावर घेत नाही पण ……!!

आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये. म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वाद निघतात. ” सावकार चुपचापपणे सर्व ऐकत होता. आता त्याला सर्व काही समजले होते. म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला. सावकाराने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती. त्याने ती भाजीभाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला, “माफ करा. बाबा चूक झाली.

आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा. तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा. उपाशी मात्र कधी झोपू नका. ” तेव्हा भिकारी म्हणाला,” देव तुमचे भले करो.” आणि निघून गेला. माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो. म्हणून फक्त चांगले कर्म करा. कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही. तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो. तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही.

कुणालाही कमी लेखू नका, कुणाचीही टर उडवू नका, कुणाची टिंगल करू नका, कुणाच्या गरीबी वरती हसू नका, कुणाला टोचून बोलू नका, कधी कुणाचा पाणउतारा करू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल, हे कुणाला सांगता येत नाही……

अशा प्रकारे माणसाचे कर्म कशा प्रकारे फिरवून येते याबद्दलची माहिती या कथेतून आपण जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *