मित्रांनो आमच्या या पेजवर आम्ही सर्व प्रकारची आरोग्य विषयक माहिती प्रसिद्ध करत असतो हे आपल्याला माहीतच आहे मित्रांनो बऱ्याच वेळेस कानामध्ये आवाज येतो. कानातला मळ बाहेर काढण्यासाठी एखादा उपाय सांगा किंवा कानाची ऐकण्याची क्षमता वाढण्यासाठी एखादा उपाय सांगा. अशा वेगवेगळ्या कमेंट्स आम्हाला वारंवार येत असतात. तर आज आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी उपाय पाहणार आहोत आणि त्याच बरोबर कानातला मळ सुद्धा सहजरित्या कसा बाहेर काढायचा त्याच्यासाठी एकदम सोपा आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत.
मित्रांनो कान अतिशय महत्त्वाचा इंद्रिय आहे आणि त्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं पण आपण नेमकं उलट करतो आपल्या कानामध्ये थोडी खाज यायला लागली की आपण जे हातात असते ते कानात घालतो जसे की सेफ्टी पिन, पेन याचा वापर करून स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत असतात.
मग ती गाडीची चावी असेल किंवा काडी असेल तर या अशा गोष्टी वापरून कानातील मळ काढू नका कानामध्ये अतिशय नाजूक असे भाग असतात कानाचा पडदा पातळ असतो आणि तुम्ही जर काहीही वापरून कानातील घाण काढू नका. यामुळे कानाचा पडदा फाटू शकतो आणि तुम्हाला कायमचं बहिरेपण सुद्धा येऊ शकतं.
मित्रांनो आपल्या कानामध्ये जी मळ जमते ती थोड्या प्रमाणात असणे अत्यंत गरजेचं असतं. कारण बाहेरील हवा धूळ बाहेरचा अतितीव्र ध्वनी ती अडवण्यासाठी कानात मेन तयार होत, परंतु प्रमाणापेक्षा जास्त मळ अनेक रोगांना निमंत्रण देत असत.
मळ जास्त प्रमाणात वाढला तर पातळ होतो आणि नाकामध्ये सुद्धा उतरतो आणि घशामधे सुद्धा उतरतो त्यामुळे ऐकू न येणे डोकेदुखीचा त्रास होतो आणि कानामध्ये बिपीन बिप सारखा आवाज येत राहतो आणि त्याचा प्रचंड त्रास होतो यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
मित्रांनो कान, नाक, जीभ हे तीन इंद्रिय एका छोट्या नलिकेद्वारे एकमेकाला जोडलेले असतात. तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता कान आणि नाक दाबल्यानंतर कानातून हवा गेल्याचे आपल्याला जाणवते त्यामुळे प्रमाणापेक्षा कानात जास्त असलेला मळ महिन्यातून आपण किमान दोन-तीन वेळा काढायला पाहिजे. आपण सहज करू शकतो.
मित्रांनो एक कप पाणी घ्या ते कोमट करून त्याच्यामध्ये थोडंस मीठ टाका. आपण नेहमी जेवणात वापरतो ते साधं मीठ टाकायचं. या पाण्याचे दोन थेंब तुम्ही कानामध्ये टाका. थोडावेळ मिठाचे पाणी कानात राहू द्या आणि नंतर कानातून पाणी बाहेर काढा. कानातील सगळा मळ तुमच्या हातावर आलेला दिसेल. औषध टाकण्याची गरज नाही. जर जखम असेल तर हा मिठाच्या पाण्याचा उपाय तुम्ही करू नका.
मित्रांनो यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. प्रत्येकाच्या घरी कांदा असतो. कांदा किसून वस्त्रगाळ करून घ्या. हा कांद्याचा रस थोडा कोमट करा आणि दोन थेंब कानात टाका आणि पाच मिनिटांनी तो रस कानातून काढून टाका. त्यामुळे कानातील मळ बाहेर निघून जाईल.
यापद्धतीने कानातील मळ काढा. पिन काडी अशा गोष्टी कानातील मळ काढण्यासाठी वापरू नका.
मित्रांनो काहीजण कानातील मळ काढण्यासाठी खोबरेल तेल कानात टाकतात. त्याऐवजी कानात बदामाचे तेल टाका यामुळे कानातील घट्ट झालेला मळ पातळ होतो आणि तो सहजपणे बाहेर निघतो.
आपल्या प्रत्येकाच्या घरी मसाल्यांमध्ये ओवा असतोच. एक कप दूध गरम घ्या दूध गाईचे किंवा म्हशीचे असले तरी चालते. या एक कप दुधात एक चमचा ओवा टाका आणि हे दूध व्यवस्थित उकळून घ्या चार पाच मिनिटे उकळू द्या यामुळे ओव्याचा अर्क दुधामध्ये उतरेल. हे दूध वस्त्रगाळ करून घ्या. या दुधाचे दोन-तीन थेंब कानात टाका. त्यामुळे कानाची ऐकण्याची क्षमता दहापट वाढेल. जर तुमची श्रवण शक्ती खूप कमी असेल तर नक्कीच फरक जाणवेल. महिन्यातून किमान दोन-तीन वेळा केला तरी चालेल. तुमच्या कानातील घाण सुद्धा बाहेर निघून जाईल.
जर एखाद्याच्या कानाला जखम झालेली असेल तर त्याला मिठाचा पाणी टाकणं शक्य होत नाही.अशा व्यक्तीने एक वाटी पाणी गरम करून त्यात एक चमचा हळद आणि थोडीशी तुरटी टाकावी आणि त्याचे मिश्रण गरम करावे. मिश्रणाला चांगली उकळी आल्यानंतर ते कोमट होण्याची वाट पाहावी आणि ते चांगले गाळून घ्यावे. त्यातले काही थेंब कानात टाकावेत. त्यामुळे कानातील जखम बरी होण्यास मदत होईल. प्रत्येक दिवशी तुम्हाला हे नवीन तयार करायच आहे. सलग दोन-तीन दिवस तुम्ही काय करायचा आहे
मित्रांनो कान फुटलेला असतो कान फुटल्यानंतर कानातून पू येतो आणि त्याचा घाण वास येतो आणि ऐकण्याची क्षमता कमी होऊन जाते जर तुम्हाचा असा कान फुटला असेल तर अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय आहे आणि यांने तुमचा कान फुटण्याची समस्या आहे ती सुद्धा बरी होते
यासाठी थोडीशी तुरटी घ्यायची आहे शाबू दाण्याच्या आकाराची तुरटी एक कप पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळून घ्यायचा आहे आपल्याला चार ते पाच मिनिटे पाणी उकळू द्यायचं आहे आणि चार ते पाच मिनिटे पाणी उकळल्यानंतर त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या नंतर वस्त्रगाळ करुन घ्यायचे आहे. या पाण्याची दोन थेंब कानात टाका एक वेळा उपाय करायचा आहे तुम्ही दोन किंवा तीन वेळा टाकलं तरी चालतो तुमचा फुटलेला पूर्णपणे बंद होईल कानातून घाण वास येतो तो सुद्धा बंद होईल आणि कानातून पू येतो सुद्धा बंद होईल.
तर प्रत्येकाने करायला सोपे उपाय आहेत. यापैकी कोणताही एक उपाय वर्षातून प्रत्येकाने दोन वेळेस केला तर वर्षभर तुमचे कान स्वच्छ राहतील. ऐकण्याची क्षमता सुद्धा वाढते. या उपायाने आपण आपल्या कानाला हात न लावता, आपल्या कानाला इजा न होता, आपण आपले कान स्वच्छ करू शकतो.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.