जेव्हा तुम्हाला जवळची व्यक्ती Ignore करते, तेव्हा फक्त हे करा…!!

मनोरंजन

मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तुम्हाला त्रास व्हावा हा त्या व्यक्तीचा एकमेव उद्देश असेल, त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो ह्याचं त्या व्यक्तीला काहीचं पडलेल नसेल तर अशा वेळेस कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तीबरोबर वागायचं हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

जी व्यक्ती आपल्याला Ignore करते, त्या व्यक्तीला Ignore करणे खूप अवघड जाते. खासकरून तेव्हा, जेव्हा ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते, आपल्याला प्रिय असते. पण जेव्हा हीच व्यक्ती, आपल्यापासून अंतर राखून असेल, आपल्याला Respect देत नसेल तर मग अश्यावेळी आपण सुद्धा तिच्यापासून थोडे अंतर ठेवलेले बरे. जेव्हा अश्याप्रकारे आपल्याला कोण Ignore करत असेल, तेव्हा काय केले पाहिजे, ह्याबद्दल मी तुम्हाला काही Tips आज आपण जाणून घेणार आहोत.

तुम्हाला Ignore करणाऱ्या व्यक्तीला Ignore करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वत:वर, स्वत:च्या ध्येयांवर, स्वतःच्या प्रगतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे.तुमचे छंद, तुमच्या आवडत्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढा. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास आणि Self Respect वाढेल. ज्यामुळे तुम्हाला Ignore करणाऱ्या व्यक्तीचा विचार करायलाच वेळ मिळणार नाही. एक लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती आपल्या बरोबर कशी वागते ह्याचा तुमच्या स्वभावाशी काही संबंध नाही. समोरच्याचे वागणे त्याच्या आतमध्ये असलेल्या गुण किंवा दुर्गुण, ह्याचे प्रक्षेपण असते.

हे वाचा:   खरं प्रेम कसे ओळखायचे ? तुमच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडचे तुमच्यावर खरं प्रेम आहे का …!!

लोक तुमच्याबरोबर जेव्हा वाईट वागतात, हे त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे. त्यामुळे त्यांचे वागणे जास्त मनाला लावून घेऊ नका.जेव्हा जवळचा व्यक्ती आपल्याला Ignore करतो, आपल्या बरोबर वाईट वागतो, तेव्हा आपल्याला वाईट वाटणे नैसर्गिकच आहे.पण आयुष्यात अजूनही गोष्टी आहेत, ज्याचा आपण विचार केला पाहिजे तुम्हाला Ignore करणाऱ्या व्यक्तीबरोबर समजा तुमची गाठभेट झाली, किंवा तिच्याबरोबर संवाद साधायची वेळ आली तेव्हा तुमचे बोलणे कामापुरतेच ठेवा, जास्त गप्पा मारत बसू नका.

ज्या विषयांवर वादविवाद व्हायची शक्यता आहे, अशे विषय टाळा.अश्या लोकांबरोबर जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करा, ज्यांना तुमची किंमत आहे, ज्यांना तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक आहे. अश्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर वेळ Spend करा, ज्यामुळे तुम्हाला फक्त आनंद मिळतो.असे केल्याने तुमची मानसिकता सकारात्मक राहील, जी तुम्हाला Move On करायला मदत करेल.एक गोष्ट स्वीकार करा, समोरच्याची मानसिकता आणि त्यांचे वागणे आपल्या Control मध्ये नाही. .

हे वाचा:   समोरच्या व्यक्तीला न दुखवता नको असलेले नाते कसे तोडावे एकदा वाचा आणि या पद्धतीने ते नाते तोडा….!!

त्यामुळे तुमचा Focus पूर्णपणे तुमच्या प्रगतीवर ठेवा.थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याला Ignore करणाऱ्या व्यक्तीला Ignore करणे खूप अवघड जाते.पण त्यांची वाईट वागणूक आपण किती दिवस सहन करणार, कुठे तरी आपण थांबलेच पाहिजे.कारण काहीही झाले तरी आपल्याला आपला स्वाभिमान महत्वाचा आहे.

अशाप्रकारे जी व्यक्ती आपल्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असते त्या व्यक्ती सोबत आपण असे वागावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *