गाडीतील उंदराला कसे पळवायचे, अगदी १००% सोपी पद्धत परत उंदीर दिसणारही नाही…..!!!

ट्रेंडिंग

मित्रांनो, चारचाकी वाहनामध्ये उंदिर यायचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थ आणी जुने प्लॅस्टिक , रबर. विशेषतः लहान मुले खाताना जे बिस्किटे किंवा चिप्सचे कण सांडतात तसेच एखादा अर्धवट राहिलेला खाद्यपदार्थ दीर्घकाळ गाडीत राहिल्याने तयार होणारा वास याला कारणीभूत ठरतो. जुन्या प्लॅस्टिकच्या पिशव्या , गाडी सर्विसिंगला जावुन आल्यावर डिकित ठेवलेले जुने तेलकट पार्टपण उंदरांना आकर्षित करतात.उबदार व अंधारी जागा त्यांना आवडते तसेच खुप दिवस वापरात नसलेल्या , किंवा अस्वच्छ गाड्या त्यांना आवडतात म्हणुन अशा गाड्या स्वच्छ ठेवणे आवश्यक ठरते.

गाडी रात्री रस्त्यावर पार्क करत असाल तर दिव्याच्या खांबाजवळ पार्क करु नये कारण पावसाळ्यातील पंखाड्या मुंग्या वैगेरे उडणारे किटक एअर कंडिशनरच्या डक्टमधे जातात आणी तेथेच मरतात , उंदरांसाठी अजुन एक आकर्षण होते. उंदीर गाडीत पुढच्या बाजुने म्हणजे बाॅनेटमधुन घुसतात आणी प्रामुख्याने वायरिंग , एसीचे पाईप खातात यासाठीच आज गाडीमध्ये होणाऱ्या नुकसान कसे थांबवावे? त्याचबरोबर उंदरांना कसे पळवून लावावे? याबद्दलचे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   हजारो रुपये वाचवणारा उपाय, कमी चालत असलेल्या गॅसची फ्लेम घरच्या घरी ठीक करा, मोजून फक्त पाच मिनिटात १००% घरच्या घरी ….!!

संशोधनातून असे दिसून आलेले आहे की उंदरांना उग्र वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते उग्र वासाकडे आकर्षित होत नाही आणि याच उग्र वासामुळे ते त्या ठिकाणाहून निघून जातात. यासाठीच आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. त्यातील पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे तंबाखुच्या पुड्या. इंजिन आणी आजुबाजुला बाॅनेटच्या आत बांधुन ठेवणे , यामुळे उंदीर येत नाहीत , परंतु तंबाखुचा वास कमी झाला की उंदरांचा त्रास पुन्हा वाढायची शक्यता असते. त्यामुळे तंबाखूच्या पुऱ्या त्या ठिकाणी सतत बदलत राहाव्या.

दुसरा उपाय म्हणजे कांद्याचा वास. कांद्यापासून निघणारा वास विषारी असतो, त्यामुळे उंदीर पळून जातात. त्यामुळे उंदरांना पळवण्यासाठी कांद्याचा वापर करा. तुम्हाला ज्या ठिकाणी असे वाटत असेल की उंदीर त्यातून येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी कांद्याचा रस किंवा कांदा कापून ठेवू शकता. लक्षात ठेवा की तो कांदा तुमच्या आहारात किंवा जेवणात येऊ देऊ नका. तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरात असणारी काळी मिरी. काळी मिरीची पूड आपल्या सर्वत्र गाडीमध्ये पसरून ठेवल्याने देखील उंदीर अजिबात गाडीमध्ये प्रवेश करत नाही.

हे वाचा:   कितीही खराब झालेली गॅसची शेगडी साफ करा मोजून फक्त दोन मिनिटांत चकाचक चमकवा या घरगुती उपायाने .....!!

अशाप्रकारे हे काही उंदीर पळून लावण्याचे काही उपाय आहेत. तुम्ही नक्कीच करून बघा याचा फायदा झालेला तुम्हाला नक्कीच दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *