मित्रांनो, ऋतू बदलला, सीझन बदलला, वातावरणात बदल झाला की लहान मुलांच्या तब्येती बिघडायला सुरू होतात. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप तसेच धाप लागणे श्वास घेण्यास त्रास होणे या समस्या होतात. अशावेळी बऱ्याच घरातील लोक घाबरून जातात. त्यांना काय करावं हे सुचत नाही. लहान मुलांच्या काळजीने त्यांचा जीव घाबराघुबरा होतो. तर अशा समस्यांसाठी आपण आज एक घरगुती आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो तुमच्या घरी वयोवृद्ध व्यक्ती घरी असतील. त्यांना जर सर्दी खोकला होत असतो. तसेच खोकला हा सर्वांनाच ऋतू बदलला की होत असतो. तर हा उपाय सर्वांसाठी करता येतो. हा घरगुती आयुर्वेदिक उपाय आपण कसा करायचा आहे हे आज पाहणार आहोत.
मित्रानो खोकला सुरू झाला की, खोकून आपल्या घशात दुखते. छातीत दुखते. काही खावंसं वाटत नाही आणि झोपही लागत नाही. यामुळे स्वभाव चिडचिडा बनतो रात्री झोप लागत नाही. या सर्व गोष्टीतून, समस्येतून मुक्तता मिळवण्यासाठी आपण दवाखान्यात लगेच जाण्याची आवश्यकता नाही. आज जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत या उपायाने तुमचा खोकला एक मिनिटात थांबेल. चला तर पाहूया हा उपाय कसा करायचा आहे
मित्रांनो या उपायासाठी आपल्याला मोहरीचे तेल, हळद आणि गूळ हे तीन पदार्थ लागणार आहेत. हे तिन्ही पदार्थ सर्वांच्या घरी सहजच उपलब्ध असतात. आपण जो उपाय करणार आहोत तो एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे
मित्रांनो, एका भांड्यात दोन चमचे मोहरीचे तेल घाला आणि त्यात थोडा गुळ घालावा. तेल तापवून त्यात गुळ विरघळेपर्यंत किंवा थोडा गरम होईपर्यंत चमच्याने हलवत रहा गुळ पूर्णपणे विरघळला पाहिजे. थोडं कोमट असतानाच हे मिश्रण प्यावे. गुळ आणि मोहरी चा तेलाचे हे प्रमाण मोठ्या व्यक्तींसाठी 15 ग्रॅम तेल आणि 15 ग्रॅम गूळ असे आहे तर लहान मुलांसाठी सात ग्रॅम मोहरीचे तेल आणि सात ग्रॅम गूळ असं आहे. या प्रमाणात मोहरीचे तेल आणि गुळ घ्यावे.
मित्रांनो अजून एक सोपा उपाय म्हणजे आपल्या हातावर गुळाचा एक छोटा खडा घ्यावा आणि त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात हळद घ्यावी हळद आणि गूळ बोटाच्या साहाय्याने रगडा व चांगले एकजीव होईपर्यंत बोटाने हलवत राहावे आणि याची गोळी करून खावी.
मित्रांनो या तयार झालेल्या आयुर्वेदिक गोळ्या जेव्हा तुम्हाला खोकला येईल तेव्हा एक गोळी खा आपण चॉकलेट किंवा गोळ्या चोखून खातो. त्या पद्धतीनेच या गोळ्या खायच्या आहेत गोळी खाताच तुमचा घसा मोकळा होईल. कफ पातळ होईल आणि खोकला ताबडतोब थांबेल. खूप सुंदर आणि रामबाण उपाय आहे मित्रांनो जरूर करून पहा.
मित्रांनो कोणताही उपाय तुम्ही करा परंतु या सोबत एक ग्लास कोमट पाण्यात छोटा अर्धा चमचा हळद घालून आणि चमचाभर मीठ घालून हलवावे. या पाण्याने गुळण्या कराव्यात हा उपाय सकाळ-संध्याकाळ किंवा दिवसातून तीन वेळेस करावा. यामुळे घशातील इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाते घशातील सूज नाहीशी होते.
मित्रांनो या घरगुती सोप्या उपायामुळे तुमचा बाळाला लगेच बरं वाटायला सुरू होईल. हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करा यामुळे घशातील इन्फेक्शन निघून जाईल. छातीतील कप पातळ होईल आणि तापही निघून जाण्यास मदत होईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका